शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

९०९ शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: May 6, 2016 01:20 IST

संच मान्यता मिळाल्याने ९०९ पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवणार नसल्याने

- आविष्कार देसाई,  अलिबागसंच मान्यता मिळाल्याने ९०९ पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवणार नसल्याने शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत मिळणार आहे, परंतु उर्दू माध्यमासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षकांनी यावेळी निरुत्साह दाखविल्याने त्यांची मात्र वानवा जाणवणार आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात गुरुवारी पदवीधर शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला सुरुवात झाली. आॅनलाइन प्रक्रिया असल्याने वशिलेबाजीला लगाम घातला गेला आहे. त्यामुळे हुशाार आणि क्वालिफाईड शिक्षक या माध्यमातून मिळणार आहेत. जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजार ५०० शिक्षक आहेत. पैकी चार हजार शिक्षक हे पदवीधर आहेत. एक हजार ३८३ पदे मंजूर आहेत, तर ३५७ पदे कार्यरत आहेत. ९०९ पदे रिक्त होती. मार्च महिन्यात सरकारकडून रायगड जिल्ह्याला संच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. भाषा, समाजशास्त्र आणि विज्ञान विषयनिहाय भरती केली जात आहे. ४ मे रोजी २३७ पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, तर ५ मे रोजी सुमारे २०० पदवीधर शिक्षकांची वर्णी लागली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.पदोन्नतीने चांगले शिक्षक विविध शाळांना मिळणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास नक्कीच वाव असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उर्दू माध्यमातून शिक्षण देण्यासाठी एकूण ८८ शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु फक्त पाचच शिक्षकांनी येथे हजेरी लावली होती.