शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यात ८,४५० नवमतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:22 IST

दोन लाख ८२ हजार मतदार बजावणार हक्क : निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

सिकंदर अनवारे 

दासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी रायगड मतदारसंघात एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत तर दुसरीकडे प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. महाड मतदारसंघात यावेळी एकूण २ लाख ८२ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, तर जवळपास ८४५० नवमतदार आपला पहिलाच मतदानाचा हक्क बजावण्यास उत्सुक आहेत.

विधानसभेचा १९४ मतदारसंघ हा माणगाव, महाड आणि पोलादपूर असा आहे. माणगावमधील काही गावांचा समावेश यामध्ये आहे. या मतदारसंघात प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. महाड मतदारसंघात पूर्वी २ लाख ७१ हजार मतदार संख्या होती ती यावर्षी वाढून २ लाख ८२ हजार झाली आहे, म्हणजेच जवळपास ११ हजार मतदार वाढ झाली आहे. यामध्ये १८ वर्षे पूर्ण झालेले ८४५० तरुण मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महाड तालुक्यात एक मतदारकेंद्र संवेदनशील आहे. मतदान करण्यासाठी लागणाऱ्या मतदान ओळखपत्रांचे वाटपदेखील जलद गतीने सुरू असून जवळपास ९७ टक्के ओळखपत्र वाटप झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ४३ एस.टी.बसेस, १८ मिनी बसेस, आणि ७ जीपची गरज लागणार असल्याचे महाडचे प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले. ज्या तरुणांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशा नवमतदारांना ओळखपत्र वाटप झाले आहे. नव्याने पाठवण्यात आलेल्या मतदारांचे ओळखपत्र लवकरच प्राप्त होईल, असे निवासी नायब तहसीलदार नाईक यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी प्रशासनाकडून केली जात असून, मतदारापर्यंत जाऊन मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करताना दिसून येत आहे. याकरिता मतदार जनजागृती रॅली काढण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी पथनाट्यातून मतदारांमध्ये तर विद्यार्थ्यांच्या संकल्प पत्रातून पालकांमध्ये जागृती केली जात आहे. ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी व्ही.व्ही.पॅट यंत्राची माहिती दिली जात आहे. याकरिता एक वाहन संपूर्ण तालुक्यात फिरत आहे. संकल्प पत्रातून पालकांकडून मतदान करण्याचा संकल्प लिहून घेणार आहेत. तालुक्यातील शाळांमधून हे संकल्प पत्र वितरीत केले जात आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार एस. व्ही. नाईक यांनी दिली.रॅली काढून विद्यार्थ्यांनी के ली मतदान जागृतीच्येथील कॉम्रेड मोरे प्रागतिक विद्यालय दासगाव यांच्यामार्फत दासगाव गावात मतदार जनजागृती अभियानांतर्गत रॅली काढून जागृती करण्यात आली.च्या वेळी शाळेतील शिक्षक आणि मुलांनी दासगाव नाका, मोहल्ला, बंदर या भागात जाऊन मतदारराजा जागा हो अशा प्रकारच्या घोषणा देऊन मतदान करण्याबाबत माहिती दिली, शिवाय मुलांच्या हातात जनजागृतीपर फलक देण्यात आले होते.च्संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे याकरिता ही रॅली काढण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर अदलापुरे, जीवन हाटे, दीपक मोरे, अनंत कांबळे, पोपट लोंढे, रामचंद्र शिंदे आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी अश्रफ म्हैसकर सहभागी झाले होते. 

टॅग्स :VotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक