शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:54 PM

७९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक : आज होणार मतमोजणी; थळ मतदान कें द्रावर दोन राजकीय पक्षांत बाचाबाची

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८२ टक्के मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरु णांसह वृद्धांनी विविध मतदान केंद्रावर गर्दी केली होती. अलिबाग तालुक्यातील थळ येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यावरून दोन राजकीय पक्षांत चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण होते. जिल्ह्यात अन्यत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सोमवारी संबंधित तहसीलदार कार्यालयात सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरु वात होणार आहे. दोन-तीन तासांत संपूर्ण जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. रायगड जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २२६ सरपंचपदासाठी आणि एक हजार ६३१ सदस्यपदासाठी, असे एकूण एक हजार ८५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य रविवारी मतदान यंत्रामध्ये बंद झाले, त्यामुळे उमेदवारांसह राजकीय नेत्यांना आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

सकाळी ७.३० वाजचा मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदान करण्यासाठी चांगलाच जोर होता. तरुणांसह महिला, वयोवृद्धांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या मतदानाचा हक्क बजावला. अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायतीच्या एका मतदान केंद्रावर दोन राजकीय पक्षांत मतदान करण्यावरून चांगलीच बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यानंतर तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. दुपारी उन्हाचा चांगलाच तडाखा असल्यामुळे मतदार कमी संख्येने बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर ५.३० वाजेपर्यंत मतदानाचा जोर चांगलाच वाढल्याचे दिसून आले.

दरम्यान, मतदान प्रक्रि या शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात १२० अधिकाऱ्यांसह एक हजार १३१ कर्मचारी तैनात के ले होते. त्यामध्ये होमगार्डचे ३०० पुरु ष, तर ७१ महिला अशा ३७१ जणांचा स्टाफ कार्यरत आहे. सहा स्ट्रायकिंग फोर्स तर ७५४ पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता.

पाटणसई ग्रामपंचायतीसाठी ६२ टक्के मतदानच्नागोठणे : रोहे तालुक्यातील पाटणसई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान रविवारी शांततेत पार पडले. पाटणसई ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी - शेकाप - शिवसेना आघाडीच्या माधवी गायकर आणि काँग्रेसच्या जनविकास महाआघाडीच्या पल्लवी देवरे यांच्यात सरळ लढत होत आहे. पाटणसईत पाच मतदान केंद्रात एकूण २१५२ मतदार असून दुपारी २ वाजेपर्यंत या ठिकाणी ६२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान शांततेत पार पडले असल्याचे पोलीस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.पेणमध्ये ग्रामपंचायतींसाठी ७१.२३ टक्के मतदानलोकमत न्यूज नेटवर्कपेण : माझा गाव माझी ग्रामपंचायत, आमचाच सरपंच या दृढ विश्वास बाळगत पेणमधील वढाव, उंबर्डे, शिर्की, कांदळे व शिहू या पाच ग्रामपंचायतींसाठी मतदारांचा उत्साह व शांततापूर्वक आलेले मतदान पाहता सरासरी ७१.२३ टक्के मतदान झाले. सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत पाच ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील एकूण १७ हजार ५६२ मतदारांपैकी १२ हजार ६९६ मतदारांनी आपला हक्क बजावीत आपले कर्तव्य पार पाडले. मतदानासाठी सरपंच समर्थकांनी लावलेली ताकद पाहता पाच ग्रामपंचायतींसाठी ७१.२३ टक्के मतदान झाले. २४ मतदान केंद्रावर शांततापूर्वक मतदान पार पडले.सर्वच ठिकाणी मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. कांदळे ग्रामपंचायतीमधील मतदानासाठी महिलांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली. वढाव, उंबर्डे, कांदळे, शिर्की व शिहू येथील सरपंचपदाच्या थेट लढतीमध्ये चुरस दिसून आली. एकूण १७ हजार ५६२ मतदारांपैकी १२ हजार ६६२ मतदारांनी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत मतदान केले. उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद होऊन सोमवारी निकालात कोणाचे भाग्य उजळते हे समजणार आहे.तीन ग्रामपंचायतींसाठी मुरुडमध्ये शांततेत मतदानलोकमत न्यूज नेटवर्कमुरु ड : तालुक्यातील मजगाव, उसरोली व आंबोली या तीन ग्रामपंचायतींमधील मतदान शांततेत पार पडले. या तीनपैकी आंबोली ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मतदान संपन्न झाले. आंबोली ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या वेळी शिवसेनेच्या विरोधात ग्रामविकास आघाडी निर्माण करून ही लढत देण्यात आली आहे. आंबोलीमध्ये १२४१ स्त्रिया तर १२९९ पुरु ष असे एकू ण २५४० मतदार आहेत, त्यापैकी १९३० मतदारांनी या ठिकाणी मतदान केले आहे. येथे ७५.९८ टक्के एवढे मतदान झाले आहे.मजगाव ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यंदाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी-शेकाप युती करून ही निवडणूक लढवण्यात आली आहे. तर या पक्षांच्या विरोधात शिवसेना व काँग्रेस आय एकत्र निवडणूक लढवत आहेत. मजगाव ग्रामपंचायतीत स्त्रिया १७६८ तर पुरु ष १७२८ असे एकूण३४९६ मतदाते आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये २४७३ मतदारांनी हक्क बजावला. या ग्रामपंचायतीसाठी ७०.७३ टक्के एवढे मतदान झाले.उसरोली ग्रामपंचायतीमध्ये एकू ण४०८४ मतदार असून, यामध्ये २०११ स्त्रिया तर २०७३ पुरु ष मतदार आहेत. मतदानाची वेळ संपली असताना येथे ७५ टक्के एवढे मतदान झाले आहे. ४०८४ मतदारांपैकी ३०८६ लोकांनी मतदान केले आहे. या ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. येथे भारतीय जनता पार्टी विरु द्ध शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी करण्यात आली आहे.सोमवारी सकाळी १० वाजता तहसीलदार यांच्या दालनात मतमोजणीला सुरु वात होणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड