शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८,००० वारकरी पंढरीकडे मार्गस्थ

By admin | Updated: July 10, 2016 00:33 IST

सगळ््या वारकऱ्यांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचे; डोळे भरून आपल्या विठूरायाचे सावळे रूप पाहण्याचे. आणि हेच सावळे गोजिरे रूप पाहण्यासाठीच

- जयंत धुळप, अलिबाग

सगळ््या वारकऱ्यांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचे; डोळे भरून आपल्या विठूरायाचे सावळे रूप पाहण्याचे. आणि हेच सावळे गोजिरे रूप पाहण्यासाठीच रायगड जिल्ह्यातील २०० हून अधिक गावांतील तब्बल आठ हजार वारकरी पंढरपूरच्या वारीस निघाले असल्याची माहिती वारकरी संप्रदायाचे निरुपणकार महाड येथील प्रशांत महाराज पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महाड-पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले या वारीत सहभागी झाले आहेत. आपल्या मतदारसंघाबरोबरच राज्यातील सर्व जनतेचे सुस्वास्थ्य आणि उत्तम पीकपाण्यासाठी ते पांडुरंगाला गाऱ्हाणे घालणार आहेत.पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी हा केवळ एक प्रवास नसून ही भक्तीची ऊर्जा असते. असीम चैतन्याचं लोण, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतमंडळींच्या पालख्या मिरवत वारकऱ्यांचा जनसमुदाय आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतो आणि चंद्रभागेकाठी अपार श्रद्धेचा आणि नि:स्वार्थ प्रेमाचा महासंगम निर्माण होतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक म्हणजेच वारी. इथे भेदभावाला जागा नाही. जातपात कोणी मानत नाही. पंढरपूर म्हणजे जणू भक्तीचा महासागर आणि वारी म्हणजे अनंत अडचणींवर मात करून या महासागराला येऊन मिळणारी भक्तगणांची नदीच, अशी भावना वारीत सहभागी झालेले रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली आहे.रायगड जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड. भारती काळण गेली २० वर्षे सातत्याने वारीत सहभागी होत असतात. यंदा अलिबागमधील १५ वकील या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. पांडुरंगाची वारी म्हणजे आनंदाचा सोहळा. संतसज्जनांच्या सहवासात प्रापंचिक दु:खांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा हा अट्टाहास आपल्याला आध्यात्मिकतेची गोडी लावून जातो. संतमहात्म्यांनी दाखवलेल्या या अनुभवसंपन्न वाटेवर गेल्या शेकडो वर्षांपासून वैष्णवांचा हा प्रवास सुरूच असल्याची भावना या वारीच्या मार्गावर मोफत आरोग्यसेवा देण्याकरिता वारीत सहभागी होणारे डॉ. रमेश तेलवडे यांनी व्यक्त केली आहे.एसटी महामंडळाचे पांडुरंगाशी अनोखे नाते१५ ते २० दिवस काढून वारीमध्ये जाता येत नाही, मात्र वारकऱ्यांकरिता राज्य परिवहन विभागाच्या रामवाडी (पेण) विभागातून यंदा एसटीच्या आठ बसेस रवाना होणार असल्याची माहिती जिल्ह्यातून एसटीच्या रामवाडी विभागाचे वाहतूक नियंत्रण प्रमुख संजय हर्डीकर यांनी दिली.आषाढी एकादशीच्या आदल्या तीन-चार दिवस पुणे येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होत असते. या भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनास घेऊन जाण्याकरिता पेण विभागाच्या २० एसटी बसेस सोमवारी व १० बसेस बुधवारी अशा एकूण ३० बसेस पुण्याला भक्तांच्या सेवेसाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली.