शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मागील १० महिन्यांपासून मानधन बंद, रायगड जिल्ह्यातील ७८५ वृध्द लोककलावंतांवर उपासमारीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 22:14 IST

Raigad News: रायगड जिल्ह्यातील लोक कलावंतांना मागील १० महिन्यांपासून मानधन मिळणे बंद झाली आहे.त्यामुळे ७८५ वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : रायगड जिल्ह्यातील लोक कलावंतांना मागील १० महिन्यांपासून मानधन मिळणे बंद झाली आहे.त्यामुळे ७८५ वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

राज्याभरातील हजारो लोक कलावंत तमाशा, नाटक , भारुड, लावणी ,किर्तन, शाहिरी पोवाडे ,पोतदार अशा  सर्व लोककला मोठ्या खुबीने आणि उत्तम प्रकारे सादर करतात. त्या-त्या प्रसंगाचे आणि वेळेचे औचित्य कलेत साठविलेले असते. या सार्‍या लोककला सादर करून नुसतेच मनोरंजन केले जात नाही तर त्यात समाजाचे भावनिक संबंध जोडलेले आहेत.या लोककलेतुन समाजाचे प्रबोधनही केले जाते. समाजातील चांगल्या चालीरीती, रितीरिवाज यांची भलावणच  केलेली असते. त्या लोकांच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत .एकंदरीत मनोरंजनाच्या दृष्टीने या लोककलांना फार महत्त्व आहे.जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अशा लोककलावंत व त्यांच्या वारसांना शासनाकडून दरमहा २२५० रुपये मानधन दिले जाते. 

जिल्हापरिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मानधन लोककलावंत व त्यांच्या वारसांच्या बॅक खात्यांमध्ये थेट जमा केले जाते. मात्र रायगड जिल्ह्यातील वृद्ध कलावंत व त्यांच्या वारसांना मागील १० महिन्यांपासून मानधनच मिळणे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे.

रायगड जिल्ह्यात जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वृद्ध लोककलावंतांची संख्या सुमारे ७८५ आसपास आहे. जानेवारी २०२२ पासून वृध्द कलावंतांना देण्यात येणारे मानधन शासनाकडून देण्यात आलेले नाही.मात्र शासनाकडून मानधनाची रक्कम प्राप्त होताच वृध्द कलावंतांना थेट त्यांच्या खात्यावर पाठविण्यात येईल अशी माहिती रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाचे अधिकारी तात्यासाहेब नारुटे यांनी दिली.

उरणमध्ये १९ वृध्द कलावंत असुन त्यापैकी ६ जण मृत्यू पावले आहेत.मात्र त्यांच्या वारसांनाही मानधन दिले जाते.मात्र जानेवारीपासून त्यांना मानधन मिळाले नसल्याची माहिती उरण पंचायत समितीचे संबंधित विभागाचे अधिकारी शैलेश म्हात्रे यांनी दिली.

मागील दहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने आर्थिक ओढाताण होत आहे.त्यामुळे वृध्द कलावंतांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ येऊन ठेपली असुन उपासमारीची पाळी आली आहे.प्रत्येक महिन्याला मानधन मिळाले तर अशी आर्थिक ओढाताण होणार नसल्याची खंत उरण तालुक्यातील तमाशा कलावंत कै. पांडुरंग म्हात्रे यांच्या वृध्द वारसदार पत्नी हिराबाई म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड