शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

केएमसीला संशोधनासाठी ७० लाख

By admin | Updated: December 8, 2015 00:55 IST

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित केएमसी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेस भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फेसंशोधनासाठी विशेष

खोपोली : खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित केएमसी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेस भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फेसंशोधनासाठी विशेष अनुदान मंजूर झाले आहे. विभागाच्या फंड्स फॉर इम्प्रुव्हमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (फिस्ट) या योजनेअंतर्गत शैक्षणिक विकास व संशोधनासाठी महाविद्यालयास ७० लाख रु पये एवढे अनुदान मंजूर झाले आहे.विज्ञान शाखेचा शैक्षणिक विकास, संशोधन, उपकरणे, प्रयोगशाळेचे संगणकीकरण, पुस्तके, मासिके, प्रयोगशाळा नूतनीकरण या बाबींसाठी या योजनेचे अनुदान वापरता येईल. विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन संशोधनास गती मिळावी व त्यातून चांगले संशोधक तयार व्हावेत, समाज व राष्ट्राच्या विकासास त्यामुळे मदत व्हावी, ही भूमिका या योजनेमागे आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महेश खानविलकर व डॉ. शरद पंचगल्ले यांनी परिपूर्ण असा प्रस्ताव शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडे सादर केला होता. महाविद्यालयाच्या या प्रस्तावाचे कलिंगा विद्यापीठ, भुवनेश्वर (ओरिसा) येथे सादरीकरण केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्याचे विभागाकडून नुकतेच कळविण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या विकासासाठी या योजनेचा उपयोग होऊन संस्था व महाविद्यालयाच्या नावलौकिकात यामुळे मोलाची भर पडली आहे. त्यामुळे पालक, नागरिक व विद्यार्थी- विद्यार्थिनींनीही आनंद व्यक्त केला आहे. महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही योजना पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. शैक्षणिक व उत्तम संशोधनासाठी या योजनेचा परिपूर्ण उपयोग करून घेऊन महाविद्यालयास प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. नरेंद्र पवार यांनी दिली. (वार्ताहर)