शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रायगडातील ६७ हजार महिलांची धुरापासून मुक्ती

By निखिल म्हात्रे | Updated: February 11, 2024 19:14 IST

अलिबाग - ग्रामीण भागातील महिलाच्या आरोग्याच्या दृष्टाने अत्यंत महत्वीची अशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मधील फेज तीन ...

अलिबाग - ग्रामीण भागातील महिलाच्या आरोग्याच्या दृष्टाने अत्यंत महत्वीची अशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० मधील फेज तीन सुरु आहे. फेज तीनमध्ये रायगड जिल्ह्यात दोन हजार ९७ नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत तर ही योजना सुरु झाल्यापासून जिलह्यात आतापर्यंत एकूण ६७ हजार १५२ जणांना याचा लाभ मिळाला असून महिलांना धुरापासून मुक्ती मिळण्यास मदत झाली आहे.

ग्रामीण व निमशहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी आजही अनेक गावांत चुलींचा वापर केला जातो. ग्रामीण भागातील खऱ्या पारंपारिक चुलीत जळणाऱ्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बळी ठरत असतात. स्वयंपाक करत असताना घराच्या आतल्या आतच खेळत राहणाऱ्या या धुरामुळे स्त्रिया व त्यांच्या आसपास बागडत असलेले लहान बालके रोगग्रस्त होऊ शकतात. जवळच्या जंगलातून व शेतातून गोळा करुन आणलेली लाकडे, वाळलेले गवत वा थापवलेल्या शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करुन ग्रामीण भागातील खियांना स्वयंपाक करावा लागतो. अनेकवेळा इंधन जमा करण्याकरिता महिलांची पायपीटही होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. ते दूर करण्यासाठी पुढाकार घेवून प्रधानमंत्री 'उज्ज्वला योजना' कार्यान्वित करण्यात आली. 

केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री 'उज्ज्वला योजने'चा शुभारंभ केला. या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र रेषेखालील सुमारे ५ कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देणे आहे आहे. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस मोफत दिला जातो. यासोबतच नवीन गॅस कनेक्शन घेतल्यावर १६०० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते जेणेकरून ते इतर आवश्यक गोष्टीही खरेदी करू शकतील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता केंद्र सरकारने दुसरा टप्पाही सुरू केला आहे.  जिल्ह्यात उज्वला योजना २.० च्या फेज तीनमध्ये आतापर्यंत अलिबाग तालुक्यात ४ हजार ९७५, कर्जत ९ हजार ८२५, खालापूर ८ हजार २७३, महाड ५ हजार ९९६, माणगाव ३ हजार २३८, म्हसळा ४ हजार ४७४, पनवेल ३ हजार ९४२, पेण ९ हजार ७६५, पोलादपूर ७८७, रोहा ५ हजार ३९८, श्रीवर्धन ४ हजार ६२३, सुधागड १ हजार ६७१, तळा १ हजार ३३२, उरण १ हजार ७८९ असे एकूण ६७ हजार २४९ उज्ज्वला जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात बीपीसीएल कंपनीकडून ३० हजार ५६९, एचपीसी कंपनीकडून २८ हजार ७६७, आयओसी कंपनीकडून ७ हजार ९१३ जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. आरोग्याचे रक्षण - केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत पाच कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, या योजनेमुळे ग्रामीण भागात भोजन बनविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरत येणाऱ्या इंधनामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम टाळता आला असून, या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या केल्यामुळे योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महिलांचे सक्षमीकरण सुद्धा साध्य करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड