शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत ४५ बालकांचा मृत्यू

By admin | Updated: November 14, 2015 02:20 IST

शासनाने गरोदर माता व प्रसूतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्यातरी दासगाव खाडी पट्टा ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांमध्ये ४५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर

दासगाव : शासनाने गरोदर माता व प्रसूतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्यातरी दासगाव खाडी पट्टा ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांमध्ये ४५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शासनाच्या माता बाल संगोपनाच्या योजनेचे वाभाडे निघाले आहे.दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात असणाऱ्या विविध समस्यांमुळे गेली चार वर्षात जवळपास ४५ नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे. याची धक्कादायक माहिती दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून उघडकीस आली आहे. शासनाने बालसंगोपनाकरिता विविध योजना राबवल्या असल्या तरी ग्रामीण भागामध्ये या योजनांचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र बालमृत्यूच्या आकड्यामुळे समोर आले आहे. एका वर्षातील जवळपास ४५ बालकांचा मृत्यू या विभागात गेल्या चार वर्षात विविध आजारांमुळे झालेला आहे. ग्रामीण भागात नवजात बालकांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष देखील याला कारणीभूत ठरत आहेत. अशा योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या अशा स्वयंसेविका गरोदर मातांना बालकांच्या योग्य वाढीसाठी आणि त्यांच्या औषधोपचाराकरिता मार्गदर्शन करत असल्या तरी ग्रामीण भागापासून मूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर खूप जास्त असल्यामुळे तत्काळ आरोग्य सुविधा पुरवण्यास अडचण येते. यामुळे दासगाव खाडी पट्ट्यातील बाल मृत्यूचे दर वाढत आहे. ग्रामीण भाग याविषयी आजही अज्ञानी असल्याने नवजात बालकांवर उपचार आणि त्यांची काळजी याबाबत दुर्लक्ष होत असले तरी शासनाच्या योजनांची देखील माहिती सहज उपलब्ध होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रावर आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने दासगाव आरोग्य केंद्रापासून जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतरावर पसरलेल्या २२ गावे व त्या ठिकाणच्या वाड्यांना आरोग्य सेवा पुरवताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य योजना आजही घरोघरी पोहचवण्यास कमकुवत ठरत आहेत. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजही बालरोग तज्ज्ञ किंवा महिला विशेष तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नाहीत यामुळे या ग्रामीण भागातील महिला आणि बालरुग्णांना शहरामध्ये उपचारासाठी किंवा प्रसूतीसाठी न्यावे लागते. यामुळे आरोग्य केंद्राची सेवा असून नसल्यासारखी आहे. तरी बालमृत्यू थांबवण्यासाठी शासकीय आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. (वार्ताहर)