जयंत धुळप / अलिबागनिसर्गाच्या अवकृपेची टांगती तलवार रायगड जिल्ह्यावर सातत्यानेच असून, सध्या तीव्र जलदुर्भिक्ष आणि ४० ते ४५ अंश सेल्सियस अशा तप्त उन्हाळ््यात होरपळून निघत असलेल्या रायगड जिल्ह्यातील ४३९ गावांना येत्या पावसाळ््यात सागरी भरतीची उधाणे आणि पुराचा धोका असल्याने रायगड जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेने त्याचा मुकाबला करण्याकरिता आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. या ४३९ संभाव्य आपत्तीजन्य गावांपैकी नदी किनाऱ्याच्या २३२ गावांना पुराचा धोका, सागर किनारच्या १२३ गावांना सागरी उधाणांचा धोका तर ८४ गावांना भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पावसाळ्यात समुद्राला येणारे उधाण, अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती, दरडी कोसळण्यामुळे डोंगरमाथ्यावर व पायथ्याशी असलेल्या गावांना उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पूर्वइतिहासाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज होत आहे. रायगड जिल्ह्यात समुद्र, खाडी आणि नदी किनाऱ्यालगतची ३५५ तर डोंगरमाथ्यावरील व पायथ्याशी असलेली ८४ अशा ४३९ गावांमध्ये पावसाळ्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ तालुक्यांनी आपले अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे ३० एप्रिल २०१७ पूर्वी सादर करण्याच्या सूचना नुकत्याच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदार व नगरपालिकेला केल्या आहेत. तालुका स्तरावरील आपत्ती निवारण आराखडे प्राप्त झाल्यावर जिल्ह्याचा आपत्ती निवारण आराखडा तयार केल्याचे पाठक यांनी सांगितले.समुद्राला भरती असेल आणि त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास समुद्र, खाडी व नदीकिनाऱ्यावरील गावांमध्ये उधाणाचे पाणी शिरून पूर येण्याची शक्यता असते. तसेच डोंगरमाथ्यावरील तसेच पायथ्याशी असलेल्या गावांमध्येही अतिवृष्टी झाल्यास दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र, खाडी आणि नदी किनाऱ्यालगतच्या, डोंगरमाथ्यावरील तसेच पायथ्याशी असलेल्या गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन गावनिहाय आपत्ती निवारण आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा व तालुकास्तरावर आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी समित्यांची स्थापना, रूग्णवाहिका, बोटींची सुविधा या बरोबरच संभाव्य आपत्तीची पूर्वसूचना नागरिक व ग्रामस्थांना देण्याकरिता ‘बल्क एसएमएस’ यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे.नदीकिनाऱ्यावरील २३२ गावांना पुराचा धोका जिल्ह्यातील सावित्री, गांधारी, कुंडलिका, अंबा, उल्हास, गाढी, काळ, बाळगंगा, पाताळगंगा,भोगावती या प्रमुख नद्यांबरोबरच पेज, रामराज, मांडला, कासाड, लेंडी, वाजापूर, ओढा, उसर्ली,धवरी, गोद, मेढा, पिटसई, तळेगाव, पढवण, वलकी, नागेश्वरी, भावे, जानसई, कार्ले,दांडगुरी या अन्य नद्या व मोठ्या ओहोळांच्या नदीकिनाऱ्यावरील २३२ गावांना अतिवृष्टी झाल्यास पुराचा धोका संभवतो. १२३ गावांना सागरी उधाणाचा धोकासमुद्रकिनाऱ्यालगतची अलिबाग तालुक्यातील १६, मुरुड ९, पनवेल ५, उरण ४ ,श्रीवर्धन १९ तर खाडी किनाऱ्यालगतच्या अलिबाग तालुक्यातील ११, मुरुड ८, पेण ९, पनवेल ११, उरण ५ , माणगाव २, महाड ६, श्रीवर्धन ११, म्हसळा ९ अशा या १२३ गावांमध्ये उधाण तसेच अतिवृष्टिमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.८४ गावांना भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोकाच्वरिष्ठ भूवैज्ञानिक तसेच रायगड भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार,रायगड जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ८४ गावांना पावसाळ््यात दरडीपासून धोका उद्भवण्याची शक्यता आहे. च्यामध्ये सर्वाधिक ३२ गावे महाड तालुक्यात तर २५ गावे पोलादपूर तालुक्यातील आहेत. उर्वरित तालुक्यात खालापूर तालुक्यात ६, म्हसळा व रोहा तालुक्यांत प्रत्येकी ४, माणगाव व कर्जत तालुक्यांत प्रत्येकी ३, मुरुड व पनवेल तालुक्यांत प्रत्येकी २ तर श्रीवर्धन, तळा व पाली तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे.
४३९ गावांना उधाण, पुराचा धोका
By admin | Updated: April 28, 2017 00:32 IST