शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

भारत बंदच्या मोर्चात ४० संघटना सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:07 IST

कर्मचारी विरोधातील सरकारचे धोरण रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक यांनी संप पुकारला.

अलिबाग : सर्वांना पेन्शन मिळावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, रिक्त पदे तत्काळ भरावीत, बेरोजगारांना रोजगार द्यावा, कामगार आणि कर्मचारी विरोधातील सरकारचे धोरण रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक यांनी संप पुकारला. बुधवारच्या संपात रायगड जिल्ह्यातील १५ हजार कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले. आंदोलकांनी मारुती नाका परिसरातील संघटना सदन येथून मोर्चाने सुरुवात झाली. बाजारपेठ मार्गे, जोगळेकर नाका, बालाजी नाका मार्गे इंडस्ट्रिअल हायस्कूल येथे मोर्चाची सांगता झाली.देशभरातील सर्व सरकारी कर्मचारी, अनेक कामगार संघटना यांनी बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला होता. या संपात देशातील केंद्र सरकारी व राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक तसेच बँक व पोस्ट कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे इंटक, सिटू इ. संघटनेशी संलग्न असलेले वीजमंडळ कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व महामंडळामधील कर्मचारी या संपात सहभागी होते. १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेत आलेल्या सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षकांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बहुसंख्य कर्मचारी, शिक्षकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही. या अन्यायकारक धोरणा विरोधात विविध कर्मचारी व शिक्षक संघटना सातत्याने सांविधानिक मार्गाने आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने पीएफआरडीए हा कायदा मंजूर केला आहे. हा कायदा रद्द करून सर्वांना पेन्शन लागू करावी आदी प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.या संपात रायगड जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, रायगड जिल्हा तलाठी संघ, रायगड जिल्हा नर्सेस फेडरेशन, महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, आदी संघटना,पोस्ट कार्यालय, बँका व इतर केंद्र सरकारी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.या वेळी समन्वय समिती अध्यक्ष वि. ह. तेंडुलकर, मध्यवर्ती संघटना संघटना अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, महसूल संघटना जिल्हाध्यक्ष राकेश सावंत, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, मध्यवर्ती संघटना कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनकेले.