शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये ४० कोटींची उलाढाल

By admin | Updated: September 14, 2015 04:09 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १९६० ते ७० च्या दशकापर्यंत पेण शहर आणि ग्रामीण परिसरातील कार्यशाळा नावाजलेल्या मूर्तिकारांच्या एकापेक्षा एक सरस अशा गणेशमूर्तींसह इतर देवादिकांच्या

पेण : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १९६० ते ७० च्या दशकापर्यंत पेण शहर आणि ग्रामीण परिसरातील कार्यशाळा नावाजलेल्या मूर्तिकारांच्या एकापेक्षा एक सरस अशा गणेशमूर्तींसह इतर देवादिकांच्या मूर्तीही येथे तयार केल्या जातात. आता त्या दशकातील मूर्तिकारांची पिढी जावून त्या पिढीचा वारसा त्यांच्या नंतरच्या दोन पिढ्यांनी सांभाळला आहे. १९८५ नंतर पेणच्या गणेशमूर्तिकलेने देश-विदेशात आपली कला नावारुपास आणली. सध्या या व्यवसायात पदवीप्राप्त शिक्षण घेतलेले तब्बल २०० ते २५० मूर्तिकार व्यावसायिक ग्रामीण भागात हा व्यवसाय सांभाळत असून वर्षभर चालणाऱ्या या मूर्तिकलेने महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. ३५ ते ४० कोटींच्या घरात गणेशमूर्तिकारांचा व्यवसाय असून पेणमधील तब्बल १५ ते २० हजार स्थानिकांना रोजगार मिळतो.हमरापूर, जोहे, कळवे, दादर, तांबडशेत येथील नव्या पिढीतील तरुणांनी १९९० नंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीस नोकऱ्यांच्या पाठीमागे न लागता मूर्तिकलेने प्रावीण्य संपादन केले. गेल्या दोन शतकात या परिसरात घरोघरी कार्यशाळा निर्माण झाल्यात. या पदवीधर तरुणांची पाचवी पिढी या व्यवसायात रुजू झाली असून वर्षाच्या दहा महिने मूर्तिकलेचा हा व्यवसाय परिसरात सुरु असतो. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या कच्च्या गणेशमूर्तीसह रंगकाम केलेल्या गणेशमूर्ती अशी वर्षभराची व्यूहरचना असून आलेल्या आॅर्डर वेळेत पोहचविण्यावर या कार्यशाळेचा भर असतो. स्थानिक गावकरी कुशल, अकुशल कारागिरांना वर्षभर रोजगार व घरची भातशेती, भाजीपाला शेती पिकवून हमरापूर-जोहे कलाग्राम चांगली आर्थिक उन्नती करीत आहेत. हमरापूर गणेशमूर्तिकार संघटनेच्या ११६ कार्यशाळा व जोहे-कळवे मूर्तिकार संघटनेच्या २४० कार्यशाळा अशा एकूण ३५६ कार्यशाळांचे साम्राज्य या कलाग्राम परिसरात आहे. जोहे संघटनेचे अध्यक्ष शंकर मोकल, हमरापूर संघटनेचे अध्यक्ष संदेश कदम, कळवे संघटना अध्यक्ष प्रदीप पाटील या विभागीय अध्यक्षांनी एकत्रित जोहे-हमरापूर गणेशमूर्ती संघटना स्थापन केली आहे. या व्यतिरिक्त दरवर्षी नव्याने होणाऱ्या कार्यशाळा पकडून ही संख्या ४०० ते ४५० च्या आसपास जाते. वाशी-वडखळ विभागातील बोर्झे, दिन, कणे, वाशी, वढाव या वाशी विभागातील शिर्की-मसद, बोटी, सिंगणवड, वडखळ, गडब या गावातील पारंपरिक मूर्तिकार व त्यांच्या वारसांचा हा पिढीजात व्यवसाय. गावातील गणेशभक्तांची पूर्वापार चालत आलेली आॅर्डर याशिवाय मुंबई, ठाणे, वसई, बोरिवली, दादर, भुलेश्वर या ठिकाणी बाप्पाच्या उत्सवापूर्वी चार दिवस अगोदर हे मूर्तिकार गणेशमूर्ती घेवून मुंबई व उपनगराचा बाजार करायचे. मात्र यावर बंदी आल्याने काही मूर्तिकार महिनाभरासाठी गाळा घेवून गणेशमूर्तीची विक्री करतात.पेण शहरातील तब्बल ३०० कार्यशाळा व ग्रामीण परिसरातील ४५० ते ५०० कार्यशाळांमध्ये वर्षभरात १८ ते २० लाख गणेशमूर्ती निर्मिती होते. यावर्षी गणेशोत्सवासाठी ८०० कार्यशाळांमध्ये तब्बल २५ लाख गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली.