शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उरणमध्ये पाणी बिलाची ४० कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:22 IST

उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

- मधुकर ठाकूरउरण : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत २५ कोटी ५९ लाख ९९८ तर उरण नगरपरिषदेकडे १५ कोटी ७ लाख ९७ हजार ९९८ रुपये अशी एकूण एमआयडीसीची ४० कोटी ८ लाख ५७ हजार ९८१ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी दिली.उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची बिले भरण्यास मात्र दिरंगाई केली जात आहे. ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत २४ ग्रामपंचायतींकडे २५ कोटी ५९ लाख ९९८ रुपयांची थकबाकी आहे. या बिलामध्ये पाण्याचे बिल, वाढीव कोटा आणि डीपीसीचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४ कोटी ८४ लाख २३ हजार चाणजे ग्रामपंचायतीकडे आहेत. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष (चिरनेर कनेक्शन) २ कोटी ७२ लाख ५ हजार ४९ रुपये थकबाकी असून हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २ कोटी १८ लाख ४१ हजार ४९४ रुपयांच्या थकबाकीमुळे ग्रामपंचायत फुंडे तिसºया तर २ कोटी १७ लाख ७१ हजार ५७७ रुपयांची थकबाकी असलेली नवीन शेवा ग्रामपंचायत चौथ्या क्रमांकावर आहे.या थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये नवीन शेवा २ कोटी१७ लाख ७१ हजार ५७७ रु., हनुमान कोळीवाडा २७ लाख ८३ हजार ३३५, करळ ५८ लाख ७२ हजार ३८९, धुतुम ८२ लाख ४५ हजार ९६६, जसखार ९९ लाख ५१ हजार १७३, बोकडवीरा १ कोटी ५४ लाख ४९ हजार ५९, फुंडे २ कोटी १८ लाख ४१ हजार ४९४, सावरखार २९ लाख ५५ हजार ८८२, डोंगरी ३७ लाख १२ हजार ३८, सोनारी ६६ लाख ४० हजार ५४९, नागाव ९२ लाख ६७७, चाणजे ४ कोटी ८४ लाख २३ हजार ७४९, चिर्ले १ कोटी ५१ लाख १७ हजार ००२, केगाव १ कोटी ४४ लाख ८५ हजार ४६९, म्हातवली ६८ लाख ७५ हजार ८३८, ग्रामविकास मंडळ तेलीपाडा २ लाख १९ हजार ३९४ आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.अशा २४ ग्रामपंचायतींकडे २५ कोटी ५९ लाख ९९८ रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा एमआयडीसीने खंडित केला आहे. अशा ग्रामपंचायतींना सध्या सिडकोमार्फत हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी दिली.उरण नगर परिषदेला पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीकडून तीन कनेक्शन देण्यात आली आहेत. कनेक्शन नं. १-१२ कोटी ६३ लाख १० हजार ५४४, कनेक्शन नं.३-८४ लाख १४ हजार ७६० तर कनेक्शन नं.७९- १ कोटी ६० लाख ७२ हजार ६९४ अशा या तिन्ही कनेक्शनपोटी १५ कोटी ७ लाख ९७ हजार ९९८ अशी थकबाकी आहे. पाणी बिलाची रक्कम टप्प्याटप्प्याने एमआयडीसीकडे भरणा केला जात असल्याची माहिती उरण नगरपालिका मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.यापैकी अनेक ग्रामपंचायती आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सधन समजल्या जात आहेत. अशा ग्रामपंचायती पाणीपट्टीची रक्कमही नियमितपणे वसूल करतात. मात्र एमआयडीसीकडून सातत्याने होणारा अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची थकीत बिले तरी भरावी कशी अशी विचारणा काही ग्रामपंचायतींकडून करण्यात येतआहे. मात्र ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी केला आहे.खंडित नळ जोडण्यारायगड जिल्हा परिषद अध्यक्ष (चिरनेर कनेक्शन) २ कोटी ७२ लाख ५ हजार ४९, मुख्यकार्यकारी अधिकारी रायगड (खोपटा कनेक्शन ) ६ लाख ४७ हजार ४४४, ग्रामपंचायत दिघोडे १ कोटी २७ लाख ७२ हजार २७२, दादरपाडा १७ लाख ६३ हजार ९१२, वेश्वी १ कोटी ९ लाख ९१ हजार९०४, रांजणपाडा ४ लाख ४६ हजार १११, नवघर २० लाख ६६ हजार ७७, पागोटे ६ लाख २४ हजार ६२३ आदींचा समावेश आहे. .थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना नोटीसाही पाठवण्यात येतात. तसेच थकबाकीदार ग्रामपंचायतींची माहीती गटविकास अधिकार्यांनाही नियमितपणे दिली जाते.त्याचबरोबर विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतीला देण्यात येणाºया शासकीय निधीतून पाणी बिलाची रक्कम भरण्याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांना कळविण्यात येते .त्याची दखल घेऊन गटविकास कार्यालयाकडून काही वेळा ग्रामपंचायतींना मिळणाºया शासकीय निधीतून पाणी थकबाकीची रक्कम अदा केली जाते. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यावधीच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होत आहे.- आर.डी.बिरंजे, अभियंता

 

टॅग्स :Waterपाणी