शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

४ कोटी रूपये खर्च होऊनसुद्धा ग्रामस्थांना नाही मिळत थेंबभर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:55 IST

पोलादपूर तालूक्यातील देवळे येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे बांधकाम निकृष्ट मुरूम साहित्य व दगडी पिंचीग व्यवस्थीतरित्या न केल्यामुळे धरण बांधातून व मुख्य वियोचकातून मोठ्या प्रमाणात

प्रकाश कदमरायगड - पोलादपूर तालूक्यातील देवळे येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे बांधकाम निकृष्ट मुरूम साहित्य व दगडी पिंचीग व्यवस्थीतरित्या न केल्यामुळे धरण बांधातून व मुख्य वियोचकातून मोठ्या प्रमाणात होणा-या पाणी गळतीमुळे ४ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या धरणास १५ वर्षे झाली तरी शेतकरी ग्रामस्थांना थेंबभर पाणी मिळत नसल्याने शासनाचे करोडो रूपये वाया गेल्याचे समोर आले आहे.डिसेंबर अखेर धरणात टिकत नाही पाणीशासनाच्या जलसंधारण (लघु पाटबंधारे विभाग) विभागाकडून करण्यात आलेल्या, देवळे धरणाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून संबधित अधिकारी व ठेकेदार यांनी सगंनमताने करोडो रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सन १९९४ ते २००३ पर्यंत झालेल्या या कामावर ४ कोटी ३५ लाख २२ हजार रूपये खर्च करूनही डिसेंबर अखेर या धराणात पाणी साठा रहात नसल्याने देवळे ग्रामस्थ व सिंचन क्षेत्रातील शेतकºयांना या धरणाचा कडीमात्र उपयोग होत नाही.विस शेतकºयांनी दिली धरणासाठी जमीन आणि रोजगारासाठी सोडावे लागले गांव२० हुन अधिक शेतकरी बांधवानी या धरणासाठी आपल्या जमीनी कवडीमोल भावाने दिल्या त्यातील काही शेतकरी अल्पभुधारक व तर काही भूमीहीन झाले.त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ न पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्याच्यांवर गाव सोडून परागदां होण्याची वेळ आली आहे. या धरणामुळे माझ्या इतर शेतकरीबांधवाची जमीन ओलीताखाली येऊ न बाग फुलवून सुखी होतील हे त्यांचे स्वप्न देखील अपूर्ण राहिले आहे. रोजगारासाठी काही शेतकºयांना मुंबई, पुणे, बडोद्याची वाट धरावी लागली आहे. देवळे धरणाने गावकºयाच्या पदरी निराशाच टाकली आहे.प्रकल्पाचा खर्च दहा पट वाढवून ठेकेदारांचे जोपासले हितसंबधदेवळे धरणाची प्रथम प्रशासकीय मान्यता सन १९८३ साली मिळाली. त्यावेळी या धरणाची अदांजे खर्च ३२ लाख ६० हजार रूपये होता. त्यानंतर पुर्नसर्वेक्षण होऊ न सन १९९६ मध्ये या कामासाठी रूपये २ कोटी ८ लाख ३५ हजार या रक्कमेची सुधारित प्रशासकिय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च दहा पट वाढवून यात फक्त ठेकेदाराचे हितसंबध जपल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.काम पुर्ण झाल्याचे दाखवून ठेकेदाराला चार कोटी पस्तीस लाखाचे बिल अदाप्रकल्पाचे काम सन १९९७ रोजी सुरू करण्यात आले. एकूण २०३ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाचा फायदा देवळे, बोजर, पितळवाडी, चाळीचा कोंड येथील शेतकºयांना होणार होता. सुरूवातीला एस.पी.रेड्डी ठेकेदार ठेकेदार होते. नंतर संबधीत खात्याने ठेकेदार बदलून हे काम सुरू ठेवले. परंतु धरण क्षेत्रातील आजूबाजूला असणारा निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरून हा बांध केल्याने व रोलींग व्यवस्थीत न झाल्याने या बांधातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली. बांधाला दगडी पिचींग व्यवस्थीतरित्या केले नाही. तसेच मुख्य विमोचक व बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने, जानेवारी दरम्यान देखील जनावरांना सुध्दा पाणी पिण्यास मिळत नाही. सन २००३ साली हे काम पुर्ण झाल्याचे दाखवून संबधित ठेकेदाराला चार कोटी पस्तीस लाख बावीस हजार रूपयाचे बिल अदा करण्यात आले.तत्कालीन पालकमंत्र्यांकडे केली होती तक्रार,पण कारवाई नाहीया धरणात पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने या कामात मोठ्या प्रमाण गैरव्यवहार झाल्याची तक्रार तत्कालीन पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्याकडे बाबा केसरकर यांच्या नेतृत्वाखालील धरणग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने केली होती, मात्र याबाबत कोणतीही कारवाई केली गेली नाही.देवळे धरणाचे काम निकृष्ट झाल्याचे अभियंत्यांकडून मान्यत्यानंतर सन २०१४ देवळे ग्रामपंचायतीने तत्कालीन सरपंचांनी आमसभेत या देवळे धरणाची दुरूस्ती व्हावी यासाठी लेखी मागणी केली. आमसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना संबधित अधिकाºयांनी या धरणामध्ये मुख्य विमोचक व सी. ओटी वर्ग मधून पाणी गळती होत असल्याचे मान्य करून गळती थांबविण्याच्या दृष्टीने धरणाच्या दुरूस्तीसाठी एक कोटी ६० लक्ष रूपयांचे अदांजपत्रक तयार करून मुख्य अभियंता (ल.पा.स्थानिक स्तर) यांचेकडे मजूंरी साठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली. मान्यतेसाठी सदर प्रकरण नाशिक येथील संकल्प चित्र संघटनेकडे पाठविल्याची माहिती दिली. मात्र आता तीन वर्षे उलटून ही या धरण दुरूस्तीच्या कामाला मान्यता मिळाली नाही. देवळे धरणाचे काम निकृष्ट झाल्याचे मान्य करून संबधित खात्याने संबधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर विभागामार्फत कारवाई चालू असल्याचे सांगितले या कामाची शासनाच्या प्रचलित नियमानुसार गुण नियत्रंण विभागाकडून गुणवत्ता चाचणी झाली अथवा नाही या बाबत उपविभाग माणगाव यांचेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.प्रकल्पग्रस्त शेतकरी दाखला देणेस विलंबधरणासाठी ज्या जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले. अशा भूसंपादन झालेल्या शेतकºयांना प्रकल्पग्रस्त शेतकरी असल्याचा दाखला देणेस विलंब होत असल्याने या शेतकºयांच्या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घेतले जात नाही. धरण सिंचन क्षेत्रात काही शेतकºयांनी उन्हाळी शेती करण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याआभावी त्यांची पिके जळून गेली. या धरणातील पाणी गळतीमुळे सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला असून गेली पंधरावर्षे पाण्याची वाट बघणाºया शेतकºयांना पाण्यासाठी अजून किती वर्षे वाट पहावी लागणार आहे हाच खरा प्रश्न आहे.देवळे धरण दुरूस्तीचे काम तातडिने करण्याची मागणीदेवळे धरण हे तातडीने दुरूस्त होणे गरजेचे आहे. बांधातून होणाºया पाणी गळतीमुळे बाधांला भेगा पडून बांध कोसळल्यास देवळे ग्रामस्थांना त्याचा धोका होऊ शकतो. पावसाळ्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण असते त्यामुळे हे धरण लवकरात लवकर दुरूस्त होणे आवश्यक आहे. सतत पाठपुरावा करूनही सबंधित खाते या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. या कामाची चौकशी होऊ न सबंधित ठेकेदारावर कारवाई करून तातडीने देवळे धरण दुरूस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी देवळे ग्रा.प.चे सरपंच गुणाजी दळवी यांनी केली आहे.------------------------------------------------------------------------