शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत ३७० नागरिकांना कुत्र्याचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:37 IST

उरणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

n  लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उरण परिसरात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. मागील तीन महिन्यांत ३७० नागरिकांचे लचके तोडले आहेत. यामध्ये बालवृद्धांचा समावेश आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मागील तीन महिन्यांत उरण शहरातच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अशा प्रकारच्या शेकडो घटना घडल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी २४ तर बुधवारी १६ नागरिकांना श्वानदंश केल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती उनपचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. तर ग्रामीण भागातही ऑक्टोबर - ११०, नोव्हेंबर - १६६ तर डिसेंबर महिन्यातील १७ तारखेपर्यंत १०४ अशा तीन महिन्यांत ३७० नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले करून जखमी केल्याची आकडेवारी शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.उरण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांची दहशत आटोक्यात आणण्यासाठी निर्बीजीकरण व लसीकरण केंद्राची उभारणी केली आहे. तीन महिन्यांपासून सुरू केलेल्या केंद्रात भटक्या कुत्र्यांना पकडून आणण्यासाठी खासगी एजन्सीमार्फत पथके नेमण्यात आली असल्याची माहिती उनपचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. पकडून आणण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांना या केंद्रात चार दिवस तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येते. या दरम्यान त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केले जाते. तसेच त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजीही घेतली जाते. मात्र भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे उरण परिसरातील ग्रामीण आणि शहरी भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तीन महिन्यांत ४८७ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे. आजही केंद्रात ३८ भटक्या कुत्र्यांवर उपचार सुरू आहेत. निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांना ज्या ठिकाणाहून पकडून आणले आहे त्याच ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते. या दरम्यान काही श्वानप्रेमी, प्राणीप्रेमी संघटनांच्या विरोधालाही सामोरे जावे लागते.- संतोष माळी, मुख्याधिकारी