शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग येथील निबंधक कार्यालयासह जिल्ह्यात ३७ पदे रिक्त

By निखिल म्हात्रे | Updated: March 4, 2024 16:46 IST

येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयासह उर्वरित जिल्ह्यात ८५ पैकी केवळ ४८ पदे भरली असून, ३७ पदे रिक्त आहेत.

अलिबाग - येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयासह उर्वरित जिल्ह्यात ८५ पैकी केवळ ४८ पदे भरली असून, ३७ पदे रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अतिरिक्त कामाचा त्रास अधिकारी व‌ कर्मचाऱ्यांना होत असल्याने ताण वाढला आहे.

रायगड जिल्हा हा मुंबई, पुणे महानगरांपासून हाकेच्या अंतरावर आहे. तसेच अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असल्याने मोठ्या प्रमाणात जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. त्यामुळे या कार्यालयातील पदे रिक्त राहणे सरकारच्या दृष्टीने नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. सरकारने पुढाकार घेऊन या कार्यालयातील पदे भरावी अशी मागणी जोर धरीत आहे.

सह जिल्हा निबंधक कार्यालयांतर्गत जिल्ह्यात दुय्यम सहाय्यक निंबधकांची ६ कार्यालय असून, त्यापैकी पनवेल येथे ५ आणि अलिबाग येथे एक कार्यालय आहे. तर १४ दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. सह जिल्हा निबंधक वर्ग एक, वर्ग दोन, सह नगर रचनाकार एक असे तीन पदे असून, ती भरलेली आहेत. या कार्यालयात सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग सहा पदे असून, ५ पदे भरली आहेत. दुय्यम निबंधकाची १५ पदे असून, त्यापैकी ८ पदे भरली आहेत. वरिष्ठ लिपिक ८ पदे असून, ती भरण्यात आली आहेत. कनिष्ठ लिपिक २५ पदे असून, त्यापैकी केवळ ४ पदे भरण्यात आली आहेत.

शिपायांची २२ पदे असून, त्यापैकी ९ पदे भरण्यात आली आहेत. दप्तर बंद, पहारेकरी, चालक यांचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, ती अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, त्यांच्या आदेशानुसार पदे भरली जातील.श्रीकांत सोनवणे, सह जिल्हा निबंधक, अलिबाग रायगड

टॅग्स :alibaugअलिबाग