शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडावर ३४२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा

By admin | Updated: May 26, 2016 03:10 IST

हिंदवी स्वराज्याचा पहिला स्वातंत्र्यदिन अशी ओळख असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाचा वर्धापन दिन सोहळा ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रभ

महाड : हिंदवी स्वराज्याचा पहिला स्वातंत्र्यदिन अशी ओळख असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाचा वर्धापन दिन सोहळा ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे एक लाखापेक्षा अधिक शिवभक्त हजेरी लावणार असल्याची माहिती या सोहळ्याचे संयोजक अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष रघुवीर देशमुख, प्रशांत दरेकर, वैभव शेडगे उपस्थित होते.युवराज संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यानिमित्त ५ व ६ जून रोजी रायगडावर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टतर्फे याप्रसंगी गडावरील सर्व प्रेक्षणीय स्थळांची फुलांनी सजावट केली जाणार असून ६ जूनला छत्रपतींच्या पालखी मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती दिली. गतवर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या दिवशी गडाकडे जाणाऱ्या मार्गावर झालेला वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेवून स्वत: संयोजन समितीचे विशेष नियोजन केले आहे. गडावर ५ जूनला गडपूजन, युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह, शिरकाईदेवी व तुळजामातेचा गोंधळ विधी कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. (वार्ताहर)भव्य मिरवणूकदुसऱ्या दिवशी ६ जूनला पहाटे ५.३० वा. पासून अभिषेक पूजा, शाहिरी मुजऱ्याने सुरुवात होणार आहे. स. ९.३० वा. युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर राजघराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रघोषात अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य मिरवणुकीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.