कर्जत : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी कर्जत तालुक्यातून ३,३४० विद्यार्थी बसले असून, तालुक्यातील नऊ केंद्रांवर १३६ कक्षांमध्ये ही परीक्षा घेण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.गेल्यावर्षी सात केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली, मात्र त्यावेळी ३,३६९ विद्यार्थी होते. यंदा दोन केंद्रांमध्ये वाढ झाली, पण परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत केंद्रावर ४१ कक्षांमध्ये १०१४, नेरळ केंद्रावर २० कक्षांमध्ये ५०३, कशेळे केंद्रावर १४ कक्षांमध्ये ३५०, कडाव केंद्रावर १५ कक्षांमध्ये ३६८, पोशिर केंद्रावर १० कक्षांमध्ये २४७, माथेरान केंद्रावर २ कक्षांमध्ये ३५, पाथरज ६ कक्षांमध्ये केंद्रांवर १४०, एलएईएस केंद्रावर १० कक्षांमध्ये २४० आणि चौक केंद्रावर १८ कक्षांमध्ये ४४३ विद्यार्थी असे एकूण ३,३४० विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. (वार्ताहर) > पालकांची गर्दीरेवदंडा : येथे स. रा. तेंडुलकर विद्यालय केंद्र असून ६७४ विद्यार्थी बसले आहेत. मंगळवारी विद्यालयाच्या प्रांगणात परिक्षार्थी सोडायला आलेल्या पालकांची गर्दी जमली होती. चौका चौकात शुभेच्छा फलक लावले होते. > नागोठणेत ५६४ विद्यार्थीनागोठणे : कोएसोच्या श्रीमती गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर व उपकेंद्र उर्दू हायस्कूलमध्ये परीक्षा सुरू झाली. या केंद्रात ५६४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्रप्रमुख म्हणून ए. बी. म्हात्रे हे काम पाहात आहेत.> पेण : तालुक्यात पाच परीक्षा केंद्र आहेत. ३९ माध्यमिक हायस्कूलमधील २३०१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले आहेत. म.ना.ने.ने. कन्या प्रशाला केंद्रावर ८२३, वडखळ जयकिसान मंदिर प्रशाला २४७, वाशी अे.टी. पाटील हायस्कूल २४२, न्यू इंग्लिश स्कूल जोहे ४०५ व जनता विद्यालय गडब ३०४ अशा २३०१ विद्याथ्यांनी मराठी विषयाचा तसेच अन्य भाषाचा पेपर लिहिला.
३,३४० विद्यार्थी देताहेत परीक्षा
By admin | Updated: March 2, 2016 02:14 IST