शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

३०० शिवारं राहणार कोरडी

By admin | Updated: March 30, 2016 01:34 IST

जलयुक्त शिवार योजनेचे योग्य नियोजन न केल्याने जिल्ह्यातील ३०० शिवारं कोरडी राहणार आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विभागाला प्राप्त झालेल्या २४ कोटी ४५ लाख रुपयांच्या

- आविष्कार देसाई,  अलिबागजलयुक्त शिवार योजनेचे योग्य नियोजन न केल्याने जिल्ह्यातील ३०० शिवारं कोरडी राहणार आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विभागाला प्राप्त झालेल्या २४ कोटी ४५ लाख रुपयांच्या निधीपैकी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी अकार्यक्षमतेमुळे सरकारच्या तिजोरीत जमा करावा लागणार आहे. भविष्यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीवर संबंधित विभागाच्या बेफिकिरीने अंकुश लागण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यास प्रथमच सुरुवात झाली. ही योजना जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून २२ कोटी ४५ लाख रुपये, सिध्दिविनायक ट्रस्ट आणि शिर्डी संस्थान यांनी प्रत्येकी एक कोटी असे एकूण २४ कोटी ४५ लाख रुपये कृषी अधीक्षक अधिकारी विभागाकडे वर्ग केले होते. त्यातील लघु पाटबंधारे कळवा ठाणे यांना सात कोटी ७५ लाख रुपये देण्यात आले होते. तर अलिबागच्या वन विभागाला एक कोटी १९ लाख, रोहे वन विभाग आठ लाख ९५ हजार, रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला एक कोटी ५१ लाख आणि कृषी अधीक्षक अधिकारी विभागाला १३ कोटी ९१ लाख पाच हजार रुपये देण्यात आले होते. जिल्ह्यातील ४५ गावांचा समावेश जलयुक्त शिवारासाठी करण्यात आला होता. ४५ गावांमध्ये एक हजार कामे घेण्यात आली होती. पैकी आतापर्यंत आठ कोटी २५ लाख रुपयांची ३७५ कामे पूर्ण झाली आहेत, तर ३२५ कामे प्रगतिपथावर आहेत. ती किती रकमेची आहेत, याचा आकडा समजू शकलेला नाही. त्यामधील कामेही कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ३०० कामांना अद्याप सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे प्रस्तावित केलेली ३०० शिवारं कोरडी राहणार आहेत.कळवा ठाणे लघुपाटबंधारे विभागाने सात कोटी ७५ लाख रुपयांपैकी सुमारे दोन कोटी रुपये खर्च न झाल्याने जमा केले आहेत, कृषीअधीक्षक अधिकारी विभागावरही सुमारे चार ते पाच कोटी रु. खर्च झाले नसल्याने जमा करण्याची नामुष्की आली आहे. ३१ मार्चपर्यंत एवढ्या रकमेचे टेंडर काढून कामांना सुरुवात करणे शक्य होणार नाही.जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा बडगाआलेला निधी त्या-त्या योजनेसाठी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड दम जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी १९ मार्चला मेमो काढून आधीच दिला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर निधी सत्कारणी लावणे तर दुसरीकडे कारवाईची टांगती तलवार असल्याने त्यांना चांगलाच घाम फुटला आहे.निधी खर्च केला नाही : मोठ्या संख्येने निधीचे वितरण करुनही काही विभागांनी खर्च केलेला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. जलयुक्त शिवार योजनेला भरघोस निधी देण्यात आला होता. तो खर्च झाला नाही. आगामी वर्षात त्यामध्ये कमतरता येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.कामांचे ई-टेंडरिंग करण्याच्या सूचना सरकारच्या आहेत. त्यानुसार कामांसाठी निविदा प्रक्रिया केली मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कामे होऊ शकली नसल्याने निधी परत करावा लागणार आहे.- के. बी. तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी