शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:06 IST

पेणच्या वाशी व वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ३० कोटी खर्चाच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

पेण : पेणच्या वाशी व वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ३० कोटी खर्चाच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस. एस. जोशी, डोईफोडे, महाकाळे या वेळी उपस्थित होते.संबंधित कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या कामगार टीमने संबंधित कामास प्रारंभ क रताच शेकापचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, झेडपी सदस्य, सरपंच व उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून जोरदार घोषणाबाजी केली. ‘क ोण म्हणतोय पाणी आणणार नाय, आणल्याशिवाय राहणार नाय’ ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ या घोषणेमुळे नवीन वर्षारंभी या पाणीपुरवठा योजनेतील श्रेयवादाची जोरदार लढाई सुरू झाली असून, निवडणूक वर्षात या श्रेयवादाचे राजकीय नाट्य चांगलेच राजकीय रंग भरणार आहे.पेणच्या हेटवण्याचे पाणी वाशी खारेपाटाला मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांत या पाण्यावरून अनेकदा राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. मात्र, या पाण्याचा राजकीय रंगात शेकापच नेहमी पुढे राहीला आहे. शेकापचा आ. विरोधी बाकावरचा असल्याने खारेपाटाला पाणी योजना राबविण्याकामी आंदोलने, मोर्चे या आयुधाद्वारे आ. धैर्यशील पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलने केली होती. यानंतर आ. धैर्यशील पाटील यांनी हेटवणे धरणाचे पाणी घेऊन पेण ते वर्षा मुख्यमंत्री निवास अशी वर्षावारी केली. त्या वेळी महाराष्टÑ दुष्काळाच्या छायेत होता. गमतीची बाब अशी की, पेणमध्ये हेटवणे धरणात मुबलक पाणी पडून असताना वितरण व्यवस्थेअभावी हे पाणी ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्याकामी एका मोठ्या निधीची आवश्यकता होती. ती वर्षावारी मुंबई मुख्यमंत्री निवासी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीए क्षेत्रात पेणचा समावेश असल्याने ३० कोटींचा निधी या योजनेसाठी मंजूर केला. त्या योजनेचे १० जुलै २०१८ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ई-भूमीपूजन केले.

टॅग्स :Raigadरायगड