शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

परवाना नूतनीकरणातून ३ कोटी

By admin | Updated: December 7, 2015 01:20 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या शासन निर्णयाव्दारे आॅटोरिक्षांच्या योग्यता प्रमाणपत्रांचे नूतनीकरण न झाल्याने रद्द अथवा व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे विहित सहमती शुल्क घेऊ

जयंत धुळप,  अलिबागमहाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या शासन निर्णयाव्दारे आॅटोरिक्षांच्या योग्यता प्रमाणपत्रांचे नूतनीकरण न झाल्याने रद्द अथवा व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे विहित सहमती शुल्क घेऊ न, नूतनीकरण करण्याची योजना १ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१५ या दोन महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आली. तब्बल ३ कोटी ३ लाख रुपयांचा विक्रमी निधी संकलित करण्याचे काम पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी दिली आहे. या योजनेत एकूण ९८४ आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. कार्यालयाला या योजनेतून परवाना शुल्कापोटी ४१ लाख रुपये, सहमती शुल्कापोटी १ कोटी ४८ लाख रुपये, थकीत मोटार वाहन करापोटी ६१ लाख रुपये तर पर्यावरण करापेटी ४४ लाख रुपये असा एकूण ३ कोटी ३ लाख रुपयांचा महसूल मिळाला. योजनेदरम्यानच्या काळात विनापरवाना अवैध प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षा व इतर वाहनांची वायुवेग पथक व महसूल सुरक्षा पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून २०० वाहनांवर कारवाई करण्यात आली. दोषी वाहनधारकांकडून ३० लाख रुपयांची दंड व करवसुली करण्यात आली आहे. तसेच ३३ वाहन चालकांवर अनुज्ञप्ती निलंबन व ३० वाहनांवर नोंदणी निलंबनाची कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केल्यामुळे परवाना नूतनीकरणाच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला.अद्यापही योग्यता प्रमाणपत्रांचे नूतनीकरण न झाल्याने रद्द अथवा व्यपगत झालेल्या आॅटेरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करुन घेण्यासाठी शासन निर्णयाव्दारे १५ डिसेंबर, २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत नूतनीकरण करणेची शेवटची संधी असून परवानाधारकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मुदतीत नूतनीकरण न केलेले आॅटोरिक्षा परवाने कायमचे रद्द करण्यात येतील. तशी नोंद परवान्याच्या अभिलेखात घेण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.