शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीवाडीतील रस्त्यासाठी ३ कोटींचा निधी खर्च

By admin | Updated: June 18, 2017 02:04 IST

पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून नागोठणे ते लाव्याची वाडी रस्ता तयार करण्यात आला असून, त्यासाठी ३ कोटी २४ लाख रु पये निधी खर्च करण्यात आला

- लोकमत न्यूज नेटवर्कनागोठणे : पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून नागोठणे ते लाव्याची वाडी रस्ता तयार करण्यात आला असून, त्यासाठी ३ कोटी २४ लाख रु पये निधी खर्च करण्यात आला आहे. हा सात कि.मी.चा रस्ता आदिवासीवाड्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून, त्यामुळे पाच वाड्यांच्या विकासासाठी हा मार्ग ठरला पाहिजे, असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. कार्यक्र माला रायगड जि. प.चे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जि. प. सदस्य किशोर जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता मैथिली बरमदे, रोहे पं. स. सदस्य संजय भोसले, बिलाल कुरेशी, नागोठणे सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, ग्रा. पं. सदस्य प्रकाश मोरे, लिंबाजी पिंगळे, कीर्तिकुमार कळस, पिगोंडे ग्रा. पं.च्या सरपंच शैला बडे, आदी उपस्थित होते. देशातील ७० टक्के जनता आजही ग्रामीण भागात राहात आहे. खेड्याचा विकास झाला, तर राज्याचा विकास होत असल्याने सामान्य माणसाला जोडणारी ही योजना येथे राबविण्यात आली आहे. केलेल्या रस्त्याच्या देखभालीची, तसेच दुरु स्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावत असून, विकासाची गंगा ग्रामीण भागातही वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्र माला येताना रस्ता खराब असल्याने आतापेक्षा तिप्पट जास्त वेळ खर्ची पडला होता. नागोठणे विभागातील रस्ते आणि मोऱ्यांच्या कामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत २ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आल्याचे किशोर जैन यांनी सांगितले.