शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

५० लाख किमतीचे २८ टन गोमांस जप्त, उरण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:25 IST

कोचिनवरून जेएनपीटीमार्गे परदेशात कतारमध्ये म्हशीच्या मांसाचा पाठविण्यात आलेला कंटेनर पुन्हा माघारी आल्यावर त्यात गाईचे मांस आढळून आले आहे.

उरण : कोचिनवरून जेएनपीटीमार्गे परदेशात कतारमध्ये म्हशीच्या मांसाचा पाठविण्यात आलेला कंटेनर पुन्हा माघारी आल्यावर त्यात गाईचे मांस आढळून आले आहे. तपासणीनंतर गोमांस आढळून आल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर उरण पोलिसांनी भेंडखळ - उरण येथील यूएलए कंटेनर गोदामातून २८ टन गोमांस असलेला कंटेनर जप्त केला. बाजारपेठेत या गोमांसाची किंमत ५० लाखांच्या आसपास असल्याची माहिती न्हावा शेवा बंदर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.जेएनपीटी बंदरातून म्हशीच्या मांसाच्या नावाखाली २८ टन मांस कंटेनरमधून कतार येथे पाठविण्यात आले होते. म्हशीचे मांस असलेला कंटेनर संशयितरीत्या कतारमधून पुन्हा जेएनपीटी बंदरातून माघारी धाडण्यात आले आहे. भेंडखळ - उरण येथील यूएलए कंटेनर गोदामात हा कंटेनर ठेवण्यात आला होता. संशयास्पद स्थितीतील कंटेनरची सीमाशुल्क विभागाच्या अधिकाºयांनी तपासणी केल्यानंतर कंटेनरमध्ये गोमांस आढळून आले. फोरेन्सिक तपासणीच्या अहवालानंतर गोमांसच असल्याच्या अहवालानंतर सीमाशुल्क विभागाने उरण पोलिसात तक्रार केली. त्यानंतर उरण पोलिसांनी गोमांस भरलेला सीलबंद कंटेनर ताब्यात घेतला असल्याची माहिती न्हावा शेवा बंदर विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल दामगुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.कतारला कंटेनरमधून पाठविण्यात आलेले म्हशीचे मांस पुन्हा जेएनपीटी बंदरातूनच परत का आले, परत आलेल्या कंटेनरमधून म्हशीच्या मांसाऐवजी गोमांस कसे आले हा सारा प्रकार संशयास्पद आहे. कतारमध्ये कंटेनर अदलाबदल झाली की येथूनच गोमांस निर्यात करण्यात आले आहे का? या संशयास्पद बाबींचा पोलीस तपासानंतरच उलगडा होईल. त्यासाठी पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली आहे.तपासानंतरच संशयास्पदरीत्या आयात-निर्यात झालेल्या कंटेनर प्रकरणाचा उलगडा होणार आहे. या प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेहीसहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :JNPTजेएनपीटी