शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कडसुरेमध्ये २८ लाखांचा अपहार

By admin | Updated: January 9, 2017 06:24 IST

ग्रामपंचायतीचे कामकाज पाहात असताना ग्रामपंचायतीच्या शासकीय रकमेचा तपशील न ठेवता खोटे हिशेब तयार करून अपहार

नागोठणे : ग्रामपंचायतीचे कामकाज पाहात असताना ग्रामपंचायतीच्या शासकीय रकमेचा तपशील न ठेवता खोटे हिशेब तयार करून अपहार केल्याप्रकरणी विभागातील ग्रामपंचायत कडसुरे (ता. रोहा) येथील तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद तरे आणि माजी सरपंच बाळा पिंगळा या दोघांच्या विरोधात रोहे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोरखनाथ वायल यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. या प्रकरणात तत्कालीन सरपंच पिंगळा यांना नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २०१३ ते २०१५ या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद तरे (रा. झोतीरपाडा) आणि सरपंच बाळा पिंगळा (रा. कागदावाडी) यांनी कडसुरे ग्रामपंचायतीचा ग्राम निधी, १३ वा वित्त आयोग निधी, पाणीपुरवठा आदी खात्यातील शासकीय रकमेचा अपहार केला असल्याची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. अपहाराची रक्कम २८ लाख २५ हजार २७९ रु पये इतकी प्रचंड आहे. शासकीय रकमेचा तपशील न ठेवता त्यांनी खोटे हिशेब तयार केल्याचे स्पष्ट झाल्याने या दोघांच्या विरोधात रोहे पंचायत समितीचे वायल यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या प्रकरणात बाळा पिंगळा यांना ६ जानेवारीला पोलिसांनी ताब्यात घेऊन शनिवार, ७ जानेवारीला रोहे न्यायालयात हजर केले असता, १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रमोद तरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी माणगावच्या सेशन कोर्टात अर्ज दाखल केला असून १३ जानेवारीला संबंधित तारीख असल्याचे पोलीससूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. पिंगळा यांचे विरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. पो. नि. संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.