शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीशिवाय चालतात २६५ स्कूलबस"

By admin | Updated: June 20, 2017 06:13 IST

जिल्ह्यात एकूण ४८८ स्कूलबसेस आहेत. त्यापैकी २२३ स्कूलबसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी बसमालकांनी तपासणी करून घेतली आहे.

जयंत धुळप। लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यात एकूण ४८८ स्कूलबसेस आहेत. त्यापैकी २२३ स्कूलबसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी बसमालकांनी तपासणी करून घेतली आहे. मात्र, उर्वरित २६५ स्कूलबसेसची तपासणी त्यांच्या मालकांनी करून घेतलेली नाही. या २६५ स्कूलबसमालकांना ‘आपले स्कूलबस परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत’ अशा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पेण उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी राजेंद्र सरक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणे व आणणे या कारणास्तव वाहतूकदारांना विद्यार्थी सुरक्षितता डोळ््यासमोर ठेवून ‘स्कूलबस’ विशेष परवाने परिवहन विभागाकडून देण्यात येतात. विद्यार्थी सुरक्षितता या स्कूलबसच्या माध्यमातून घेण्यात येते. यावर विश्वास ठेवून पालक मुलांना अशा स्कूलबसमधूनच शाळेत पाठवत असतात; परंतु प्रत्यक्षात स्कूलबसमालक बसची शाळा सुरू होण्यापूर्वी परिवहन विभागाकडून तपासणी करून घेत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तब्बल २६५ स्कूलबसची परिवहन विभागाकडून तपासणी झालेली नाही. मात्र, या २६५ बसेसमधून विद्यार्थ्यांची ने-आण मात्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबसची तपासणी करून घेण्याच्या सूचना पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूलबसमालकांना देण्यात आल्या होत्या. शाळा सुरू होण्यापूर्वी ही तपासणी करून घेणे अनिवार्य होते. ज्या स्कूलबसमालकांनी आपल्या वाहनाची तपासणी अद्याप केलेली नाही, त्यांना त्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही या वाहनमालकांनी आपल्या स्कूलबसची तपासणी करून घेतली नाही, तर त्यांच्या वाहनाचा स्कूलबस परवाना निलंबित केला जाणार आहे.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात घडू नये, याकरिता त्यांची योग्य ती तपासणी करण्यात यावी, या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गतवर्षापासून आरटीओकडून स्कूलबसची तपासणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्कूलबसच्या सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शाळांकडून नेमलेल्या अथवा खासगी स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुुरेशी काळजी घेतली जात नव्हती. चालकांच्या बेशिस्तीमुळेही अनेकदा अपघात घडत होते. अनेकदा नादुरुस्त अवस्थेतील वाहनेही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरली जात होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर गतवर्षी झालेल्या सुनावणीत स्कूलबससाठी तपासणी आवश्यक करण्यात आली होती. प्रतिवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूलबसमालकांनी आरटीओकडून ही तपासणी करून घ्यायची असल्याचे उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी राजेंद्र सरक यांनी स्पष्ट केले आहे.