शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील २५३ शेतकरी कृषी पंप वीजजोडणीस वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:43 IST

रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही. मात्र, शेतकºयाचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आॅनलाइन पद्धतीने हे अर्ज स्वीकारून कारवाई करीत असल्याचा दावा वीज वितरण कंपनी करीत आहे.वीज वितरण कंपनीच्या संगणक आज्ञावलीमध्ये आॅनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीमुळे तसेच सौरऊर्जेवर आधारित पंप देण्याच्या योजनेच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज प्रलंबित असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता एम. एम. मुंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरिप हंगाम पूर्व जिल्हास्तरीय बैठकीत दिली आहे.३१ मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात एकूण १७ हजार २५२ वीजजोडणी झालेली आहे. मार्च २०१८ अखेर ५२१ वीजपंप अर्ज पैसे भरून प्रलंबित होते. मार्च २०१९ पर्यंत त्यापैकी ३८७ पंपांना वीजजोडणी दिलेल्या असून, २५३ वीजजोडणी प्रलंबित आहेत. याबाबतची कारणे जिल्हाधिकाºयांनी विचारली असता, उप कार्यकारी अभियंता मुंडे यांनी पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या २५३ शेतकºयांना लवकरात लवकर वीजजोडणी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.किमान वीज बील भरावे लागणारजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्याच्या आत या जोडणी मिळण्याची शक्यता नाही. परिणामी, पाऊस सुरू झाल्यावर कृषी पंपांना वीज मिळाली तरी पंपांचा वापर शेतीला करावा लागणार नाही. मात्र, किमान येणारे वीज बिल शेतकºयांना भरावे लागणार आहे. यामुळे श्रमिक मुक्ती दल संघटनेचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी वीज वितरण कंपनीच्या या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड