शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मजूर संस्थांना २५२ कोटींच्या कामांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:53 IST

अंकुश चव्हाण यांनी घेतली दखल : तक्रारीनंतर कामवाटपांना ब्रेक

- आविष्कार देसाई

अलीबाग : रायगड जिल्ह्यातील मजूर सहकारी क्षेत्रात सुरू असलेला भ्रष्टाचारावर ‘लोकमत’ने आघात केला होता. तहसीलदार यांनी मजूर असल्याचे दाखलेच दिलेले नाहीत ही बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील मजूर सहकारी संस्थेच्या कारभाराची पाहणी केली असता तब्बल २५२ कोटी रुपयांची कामे जिल्ह्यातील विविध मजूर सहकारी संस्थेच्या नावावर काढल्याचे आता उघड झाले आहे.

प्रशासनाने मजुरांना अधिकृत दाखले दिलेले नसतील तर, कोट्यवधी रुपयांची माया नक्की कोणाच्या खिशात गेली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याची गंभीर दखल रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी घेत मजूर सहकारी संस्थेतील खरे आणि बोगस मजूर कोण आहेत, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खुलेआम सुरू असलेला भ्रष्टाचार खरेच कोणत्याच यंत्रणेच्या लक्षात आला नाही का अथवा त्यांनी त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली. मजूर सहकारी संस्थांच्या व्यवहाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले का? याचा छडा लावण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सरकार आणि प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. याची गंभीर दखल रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी तथा जिल्हा परिषद कामवाटप समितीचे अध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी घेतली आहे.

मजूर सहकारी संस्थांमधील खरे मजूर शोधण्यासाठी मजूर संस्थांची तपासणी करण्याबाबत त्यांनी रायगडच्या जिल्हा उपनिबंधकांना पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

या बाबतची सर्व जबाबदारी नियमानुसार जिल्हा उपनिबंधक यांची आहे. त्यांच्याकडून सविस्तर माहिती मागविण्यात येत आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कामवाटपाबाबत निर्णय घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी चव्हाण यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जिल्हा परिषदेमार्फत मजूर संस्थांना वाटप होणारी कामे जिल्हा उपनिबंधकाचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्या कामांचे वाटप होणार नसल्याचे अधोरेखित करते. त्यामुळे कामवाटप समितीच्या बैठकीकडे डोळे लावून बसलेल्यांना सध्या तरी, केवळ वाट बघावी लागणार आहे.

दरम्यान, १५ तालुक्यांतील सर्व मजूर सहकारी संस्थांची माहिती मधुकर ठाकूर यांनी २६ मार्च २०१८ रोजी मागितली होती. सहायक निबंधकांनी तातडीने जिल्हा कार्यालयात ती माहिती सादर करावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांनी ४ एप्रिल २०१८ रोजी दिले आहेत.

त्या बाबतच्या माहितीचे उत्तर आले नाही म्हणजे संबंधित मजूर संस्था बोगस आहेत अथवा काय, याची माहिती आलेली नसताना खोडका कामवाटप करण्यासाठी समितीची बैठक लावण्यासाठी अट्टहास करत असल्याकडेही ठाकूर यांनी लक्ष वेधले.स्वतंत्र फेडरेशनरायगड जिल्ह्यात मजूर सहकारी संस्थांचे जाळे विस्तारलेले आहे. त्यांचे स्वतंत्र फेडरेशनही आहे. सरकारी कामे बहुतांशी या संस्थांनाच दिली जातात.मजुरांनी संस्था स्थापन करून सरकारी कामे करावीत. त्यातून मजुरांची आर्थिक उन्नती होईल, असा या मागे सरकारचा उद्देश आहे. मात्र, राजकीय लेबल असलेल्यांनीच मजूर संस्था स्थापन करून सरकारी कामे मिळविल्याचे लपून राहिलेले नाही.जिल्हा परिषदेमार्फत मजूर संस्थांना वाटप होणारी कामे जिल्हा उपनिबंधकाचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्या कामांचे वाटप होणार नसल्याचे अधोरेखित करते. त्यामुळे कामवाटप समितीच्या बैठकीकडे डोळे लावून बसलेल्यांना सध्या तरी, केवळ वाट बघावी लागणार आहे.अत्यंत सधन गटातील व्यक्तींची नावे या संस्थांच्या मजूर यादीतजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत मजूर संस्थांच्या तपासणीचा निर्णय घेतल्याने आता मजूर संस्थांमधील खरे मजूर व खोटे मजूर कोण आहेत, हे उघड होण्यास मदत मिळणार आहे. या बाबत जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.