शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अलिबाग-रोहा रस्त्यासाठी २२९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:44 IST

रस्त्याचे जाळे उभारण्यावर भर : हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत निविदांना प्रतिसाद न आल्याने सरकारचा नवा फार्म्युला

आविष्कार देसाई अलिबाग : अलिबाग-रोहा ८५.६३ किलो मीटरच्या या चारपदरी रस्त्यासाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. यासाठी तब्बल २२९ कोटी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याने अलिबाग-रोहा रस्त्यावरून सुसाट वेगाने जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पायाभूत सुविधा उभारण्यात मागे असणाऱ्या रायगड जिल्ह्यामध्ये हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत मध्यंतरी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सुमारे ८५० कोटी रुपयांचे रस्ते बांधण्याचे भाजप सरकारने जाहीर केले होते. मात्र, ८५० कोटी रुपयांच्या एकत्रित पॅकेजमधील रस्ते निर्माण करण्याला कोणत्याच निविदेला ठेकेदाराने प्रतिसाद दिलेला नव्हता. त्यामुळे आता विविध भागांमध्ये रस्ते निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला कितपत यश येते हे लवकरच कळणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे बॅनर येथील काही स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला होता. त्यामुळे विकासकामांसाठी त्यांनीच निधी आणला, असे चित्र जनतेमध्ये निर्माण होत होते. याचा विचार करून आता भाजपच्या नेत्यांनी कोणी श्रेय घेण्याच्या आधीच करत असलेल्या विकासकामांची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु त्यांनी जी विकासकामे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तीच विकासकामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन मार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मार्गांसाठी सुमारे ८५० कोटी रुपये मंजूर केले होते. या ८५० कोटी रुपयांमध्ये दोन्ही जिल्ह्यांतील रस्त्याचे एकत्रित पॅकेज होते, त्यामुळे या कामांसाठी काढलेल्या निविदेला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या विकासकामांचे ५० ते १०० कोटी रुपयांचे भाग (टप्पे) करण्यात आले होते. त्यालाही अल्प प्रतिसाद आला होता, त्यामुळे नव्याने आता अलिबाग-रोहा, रोहा-मुरुड आणि पोयनाड-नागोठणे असे विकासकामाचे स्वरूप करण्यात आले.

अलिबाग-रोहा (राज्य मार्ग-०९) या ८६.६३ किलो मीटरच्या रस्त्यासाठी २२९ कोटी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तसेच पोयनाड-नागोठणे (राज्य मार्ग-८७) या २९.०५ किलो मीटरच्या रस्त्यासाठी ४२ कोटी ७४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली.

१) ६० टक्के खासगीकरणातून आणि ४० टक्के सरकारी निधीतून अलिबाग-रोहा हा चारपदरी मार्ग करण्यात येणार आहे. म्हसळा तालुक्यातील साईपर्यंत हा मार्ग उभारण्यात येणार आहे. त्याची पुढे कनेक्टिव्हीटी दिघी पोर्टपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे खासगी ठेकेदाराचा ६० टक्के निधीचा खर्च वसूल होण्यास मदत मिळणार आहे, असे अ‍ॅड. मोहिते यांनी स्पष्ट केले.

२) चारपदरी होणाऱ्या रस्त्यांसाठी जमीन संपादन करावे लागणार आहे. यासाठी २०१३ चा नवीन भूसंपादन कायदा लागू करण्यात येणार असल्याने जमिनीला कोट्यवधी रुपयांचा दर मिळणार आहे. त्यामुळे जमीन देण्याला विरोध होणार नाही, असा विश्वास अ‍ॅड. मोहिते यांनी व्यक्त केला.

टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेचे काय?हा रस्ता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर बांधण्यात येणार असल्याने त्यावर टोल लागणार का? या बाबत अ‍ॅड. मोहिते यांनी समपर्क उत्तर दिले नाही. त्यामुळे भविष्यात या रस्त्याला टोल लावल्यास युती सरकारच्या टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणेचे काय? असा सवालही उपस्थित होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकalibaugअलिबाग