शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श ग्राम स्पर्धेसाठी २२ ग्रामपंचायतींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:08 IST

पहिल्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड अणि पुणे १२ जिल्ह्यांमध्ये आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अलिबाग : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत (व्हिलेज सोशल ट्रान्सफॉरमेशन फाउंडेश्न) पहिल्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड अणि पुणे १२ जिल्ह्यांमध्ये आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील जिल्हा स्वयं मूल्यांकन, मासिक प्रगती अहवाल आणि विभागाच्या बऱ्याच गावांमध्ये सामाजिक, आर्थिक, भौतिक बदल झाल्याचे दिसून येत आहेत. या ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्रोत्साहन देऊन आदर्श ग्राम निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श ग्राम स्पर्धा ज्या जिल्ह्यांमध्ये लागू झाली आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ज्या गावांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी गावातील कामांचे स्वमूल्यांकन करून त्याचा प्रस्ताव आणि व्हिडीओ गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा. त्या व्हिडीओची पुन्हा एकदा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातर्फे छाननी करण्यात येणार आहे. अशाप्रकारे राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये १२ जिल्ह्यातून तीन उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड आदर्श ग्राम स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ११ जुलै ते २० जुलैपर्यंत व्हीएसटीएफ ग्रामपंचायतींनी आदर्श ग्रामसाठी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर २२ जुलै ते ३१ जुलै दरम्यान समिती ग्रामपंचायतींची पाहणी करून, वस्तुस्थितीवर आधारित मूल्यांकन करून त्यांना गुणांकन देतील. १ आॅगस्ट ते ७ आॅगस्ट या कालावधीत जिल्हा अभियान परिषद उत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींचा छायाचित्रांसहप्रस्ताव राज्यस्तरावर सादर करतील. १० आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट दरम्यान राज्यस्तरावरून ग्रामपंचायतींची तपासणी आणि मूल्यांकन करण्यात येणार आहे.राज्यस्तरावरून या ग्रामपंचायतींचे अंतिम गुणांकन करून, संबंधित ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर समारंभपूर्वक रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. आदर्श ग्राम निर्माण करताना ज्या जिल्ह्यांनी जास्तीत जास्त सरकारी योजनांचे कृती संगम केलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना सुध्दा सन्मानित करण्याचा विचार होईल. आदर्श ग्राम निर्मितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाºया व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपरिवर्तक, जिल्हा समन्वयक, लिड डेव्हलपमेंट पार्टनर प्रतिनिधी यांनासुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे.।‘ग्रामपंचायतींकडून प्रतिसाद मिळेल’व्हीएसटीएफमधील ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ही योजना दीड वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियान यशस्वीपणे काम करत आहे.ज्या गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधादेखील नाहीत अशा गावांमध्ये ग्रामपरिवर्तक जाऊन विकासकामांना गती देत आहेत. त्यामुळे या सर्व लोकांच्या व गावांच्या कामांची दखल घेण्याकरिता आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेला ग्रामपंचायतींकडून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असे महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम म्हणाले. आदर्श ग्राम निर्मितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाºया व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपरिवर्तक, जिल्हा समन्वयक, लिड डेव्हलपमेंट पार्टनर प्रतिनिधी यांचाही सन्मान होणार.