शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात २१ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:19 IST

सत्पाळा व पालीत चुरशीची शक्यता

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायतींच्या सत्तेतही आता महिलांना ५० टक्के वाटा मिळालेला असून, अनेक ग्रामपंचायतींचा कारभार महिला सांभाळताना दिसत आहेत. वसई तालुक्यातील सत्पाळा आणि पाली या दोन ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुकीनंतरही तेथे महिलाराज येणार हे आधीच स्पष्ट झालेले असून, निवडणुकीची पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २१ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून महिला उमेदवारही ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच महिला आरक्षण होते, पण आता या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा आरक्षणाची सोडत होणार असल्याचे पुन्हा महिलाराज येईल का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने, सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत.

सत्तेतील वाट्यामुळे महिला उमेदवारांना महत्त्वअलीकडच्या काळात  ग्रामपंचायतींच्या सत्तेत महिलांनाही समान वाटा दिल्याने महिला उमेदवारांना मोठे महत्त्व आले आहे. अनेकदा सत्तेच्या चाव्याही महिला उमेदवारांकडे असतात. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात महिलांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. विधानसभासभा निवडणुकीनंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे या वर्षभरात कोणतीही निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे वर्षभरातील ही ग्रामपंचायत निवडणूक पहिलीच आहे.

राजकीय पक्षांमध्ये जिंकण्यासाठी चुरस वसई तालुक्यात होत असलेल्या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते यांनाही या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता आहे, तर राजकीय पक्षांना ही पहिली निवडणूक असल्याने ती जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागणार आहेत. यामध्ये निवडून आलेल्या महिला उमेदवारांना मोठे महत्त्व येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

विजयाची लाॅटरी कुणाला लागणार ?कोरोनाच्या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, यात पालघर जिल्ह्यात फक्त तीन ग्रामपंचायती असून, पालघर तालुक्यातील सांगावे व वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसईतील दोन ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आता २१ महिला रिंगणात आहेत. त्यांच्यापैकी कुणाकुणाला विजयाची लाॅटरी लागते याविषयी नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक