शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ८१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 02:30 IST

पंचायत समितीचा टंचाई कृती आराखडा १ कोटी १८ लाखांचा

पेण : आडात भरपूर प्रमाणात पाणी असूनही सक्षम वितरण प्रणालीच्या कमतरतेमुळे पेणच्या खारेपाटातील जनतेला नव्या वर्षातही पाणीटंचाईच्या शुक्लकाष्टास सामोरे जावे लागणार आहे. नव्या वर्षात नव्या संकल्पाची मुहूर्तमेढ केली जाते. मात्र, २०२० वर्षातही पेणमधील पाणीटंचाईच्या उपाययोजनेसाठी टंचाईग्रस्त ६४ गावे, १७० वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ८१ लाख रुपयांची नव्या वर्षात तरतूद केली आहे.

पेण पंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा एक कोटी १८ लाख इतक्या रकमेचा असून, या उपाययोजना नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यानंतर सुरू होणार असल्याचे एकंदर चित्र दिसत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पेणवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ ही समस्या दोन दशकांपासून कायमची आहे. खारेपाटातील वाशी विभाग, वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांसह, आदिवासी, कातकरी, वाड्यांवर पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. एकूण ६४ गावे १७० वाड्यांवर फेब्रुवारी महिना संपताक्षणी पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते. पंचायत समिती प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या समस्या लक्षात घेऊन टंचाईगस्त गावे व वाड्यांसाठी उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ८१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय विंधन विहिरी बांधण्यासाठी चार गावे ६३ वाड्यांसाठी ३७.५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. उपाययोजना करण्यात आलेली ६८ गाव आणि २३३ वाड्या मिळून एकूण ३०१ उपाययोजनेतील गाव व वाड्यांची संख्या आहे.पेण, वाशी, वडखळ, खारेपाटासाठी ३० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम या नवीन वर्षाच्या मे २०२० अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही टंचाईची समस्या लक्षात घेऊन पंचायत समिती प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या उपाययोजना म्हणून एक कोटी १८ लाख रुपयांची कृती आराखड्यात तरतूद केलेली आहे.

टॅग्स :Raigadरायगड