शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

११ कोटींची पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे थकीत; पाच कोटी १२ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 02:43 IST

रायगड जिल्हा परिषदेला पाणीपट्टीमार्फत दरवर्षी १४ कोटी सात लाख रुपयांचा निधी प्राप्त होतो.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून आतापर्यंत फक्त पाच कोटी १२ लाख ४२ हजार रुपयांची पाणपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. मात्र, अद्यापही तब्बल ११ कोटी ३७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल करणे बाकी आहे. ३१ मार्चअखेर सर्व पाणीपट्टी वसूल करण्याचे ग्रामपंचायत विभागापुढे मोठे आव्हान असल्याचे दिसून येते.रायगड जिल्हा परिषदेला पाणीपट्टीमार्फत दरवर्षी १४ कोटी सात लाख रुपयांचा निधी प्राप्त होतो. २०१९-२० साठी १६ कोटी ५० लाख ७४ हजाराची वाढीव म्हणजेच सुमारे अडीज लाख रुपयांची मागणी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आणि नागरिकांच्या असहायतेमुळे पाणीपट्टी वसूल करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. योग्य पद्धतीने आणि वेळेमध्ये वसुली होत नसल्यानेच विविध ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी निधी देताना जिल्हा परिषदेला चांगलेच अडचणीचे ठरत आहे.रायगड जिल्ह्यात ८०९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज, ग्रामपंचायत हद्दीतील अन्य विकास कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. ग्रामपंचायती हद्दीतराहणाºया नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केलाजातो. त्यासाठी पाइप लाइनद्वारे सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी पाणी दिले जाते. यामुळे ग्रामपंचायतीसाठी ठरावीक कर रूपाने नागरिकांकडून पाणीपट्टीमार्फत रक्कम आकारते.रायगड जिल्हा परिषदेकडे आलेल्या पाणीपट्टीतून त्या-त्या ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी निधी वर्ग केला जातो.नागरिकांनी पाणीपट्टी भरली नसल्याने आणि ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दुर्लक्षामुळे थकबाकीग्रामपंचायतीने दिलेल्या पाण्याची पाणीपट्टी ही नागरिकांनी वेळेवर भरणे गरजेचे असते. मात्र काही नागरिक पाणीपट्टी ही वेळेवर भरत नसल्याने पाणीपट्टीची रक्कम थकीत राहते.वास्तविक ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरण्यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे असते मात्र या ठिकाणी ग्रामपंयातींकडून दुर्लक्ष होत असल्याचे थकीत रकमेवरुन दिसून येते.ग्रामपंचायतीने वसूल केलेली पाणीपट्टी रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे मार्च अखेरपर्यत जमा करायची असते.परंतु जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतीमध्ये मार्च महिना उलटून गेला तरी अद्याप ११ कोटी ३७ लाख रुपयांची वसूली थकीत राहिली आहे. आॅक्टोबर महिन्यांपर्यंत सुमारे ३१ टक्के पाणीपट्टी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी भरली आहे.पाणीपट्टीची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींकडून वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३१ मार्च अखेरपर्यंत सर्व थकीत रकमेची वसुली करण्यात येणार आहे.- शीतल पुंड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत.

टॅग्स :Raigadरायगड