शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाकडे 19 हजार लाभार्थींची पाठ; महिनाभरात रायगड जिल्ह्यात 95.70 टक्के वाटप 

By निखिल म्हात्रे | Updated: October 29, 2023 17:02 IST

दिवाळी सणाचा आनंदाचा शिधा वाटपाची तारिख निश्चीत झाली तरी गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाचे संच संपलेले नाही.

 अलिबाग - दिवाळी सणाचा आनंदाचा शिधा वाटपाची तारिख निश्चीत झाली तरी गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाचे संच संपलेले नाही. रायगड जिल्ह्यात 25 ऑक्टोबरपर्यंत 95.70 टक्के संचांचे वाटप झाले आहे. 19 हजार 392 संच अद्यापही शिल्लक आहेत. सर्वात जास्त वाटप कर्जत तालुक्यात तर सर्वात कमी वाटप पनवेल तालुक्यात झाले आहे. आगामी दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटपासाठी शासनाने नियोजन करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखर व एक लीटर खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले संच ‘आनंदाचा शिधा’ गणेशोत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या एक दोन दिवस आधी रास्तभाव धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला.

रायगडसाठी शंभर टक्के म्हणजेच 4 लाख 29 हजार 854 संच उपलब्ध झाले होते. वाहतूकदारांच्या संपामुळे आनंदाचा शिधाचे रायगड जिल्ह्यात उपलब्ध होण्यास विलंब झाला. तरीही गणेशोत्सवाच्या एक-दोन दिवस आधीपासून रायगड जिल्ह्यात आनंदाच्या शिधाचे वाटप सुरू झाले होते.  त्यानंतर 2 आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे 82 टक्के वाटप झाले होते. कर्जत तालुक्यात सर्वाधिक तर तळा तालुक्यात कमी वाटप होते. तर 11 आॅक्टोबरपर्यंतही संचांचे पूर्ण वाटप होऊ शकलेले नाही. त्यात थोडीफार वाढ होऊन हे वाटप 87.18 टक्केपर्यंत पोहोचले आहे. गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा वाटप सुरू होऊन जवळजवळ आता एक महिना होत आला आहे. तरीही रायगड जिल्ह्यात 19 हजार 392 लाभार्थींनी आनंदाचा शिधा संच घेतले नाहीत. जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे 4 लाख 29 हजार 854 लाभार्थ्यांना 100 टक्के शिधा संच उपलब्ध झाले होते. मात्र त्यापैकी 95.70 टक्के अर्थात 4 लाख 10 हजार 462 संचांचे वाटप झाले आहे.

वाहतूकदारांच्या संपामुळे आनंदाचा शिधाचे संच रायगड जिल्ह्यात उपलब्ध होण्यास विलंब झाला. त्यात गणेशोत्सवात आलेल्या सुट्टया व गणेशोत्सवात जिल्ह्यात आलेले चाकरमानी यांच्यासाठी असलेला शिधा न घेताच ते पुन्हा शहराकडे रवाना झाल्याने आनंदाचा शिधाचे संच शिल्लक रहाण्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. शिल्लक रहाणारे आनंदाचे शिधाचे संच जेथे उपलब्ध आहेत त्या ठिकाणच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे त्याच किमतीत वाटप करण्यात येईल असे पुरवठा विभागाने म्हटले होते. मात्र अद्यापही 19 हजार 392 लाभार्थ्यांनी आपले संच घेतलेलेच नाही. सध्या पामतेलाचा घरगुती खाद्य पदार्थांमध्ये वापराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेही नागरिक आनंदाचा शिधा घेण्यास रस दाखवत नसल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यात शिल्लक संच संख्या (वाटपाची टक्केवारी)कर्जत - 574 (98.62), म्हसळा - 195 (98.35),  उरण - 2233 (97.82),  श्रीवर्धन - 1340 (96.94),  मुरुड - 270 (98.34),  रोहा - 2129 (93.05),  अलिबाग - 1693 (95.85),  खालापूर - 3241 (93.65), पनवेल - 7182 (91.41),  माणगाव - 1891 (97.50),  पेण - 965 (97.62), पोलादपूर - 745 (92.41),  सुधागड - 1548 (91.43),  महाड - 1609 (97.92),  तळा - 508 (94.62),  एकूण- 19392 (95.70).

टॅग्स :Raigadरायगड