शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

जिल्ह्यात १९ अनधिकृत शाळा

By admin | Updated: June 16, 2017 02:14 IST

रायगड जिल्ह्यात १९ ठिकाणी शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरू आहेत. अशा अनधिकृत शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये शासनाची परवानगी

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : रायगड जिल्ह्यात १९ ठिकाणी शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरू आहेत. अशा अनधिकृत शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये शासनाची परवानगी प्राप्त केल्याशिवाय संबंधित संस्थांनी शाळा सुरू करू नयेत. अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण हक्क कायदा -२००९ अन्वये व याबाबतच्या महाराष्ट्र शासन नियमावली २०११ नुसार उचित कार्यवाही करावी. पालकांनी पाल्यांस अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे प्राथमिक शाळेत प्रवेश देवू नये, असे आवाहन रायगड जि.प. प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी एका सरकारी पत्राद्वारे केले आहे.अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालकच जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची घोषणा शाळा प्रारंभाच्या आदल्याच दिवशी करण्यात येते. त्यातून पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतो. अशा किती आणि कोणत्या अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने काय कारवाई केली, याबाबतची माहिती आजवर कधीही प्रकाशित करण्यात आलेली नाही. अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या शाळा पुढील शैक्षणिक वर्षात रीतसर सुरू असल्याचे सर्वत्र दिसून येते. मग शिक्षण विभाग दरवर्षी हा संभ्रम का निर्माण करते असा प्रश्न उपस्थित करुन, रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांवर आजवर काय कारवाई केली याचा अहवाल पत्रकारांच्या माध्यमातून प्रसिध्द करावा अशी मागणी सामाजिक तथा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.अनधिकृत १९ शाळांपैकी पनवेल तालुक्यातील ११ शाळाजिल्ह्यातील या १९ घोषित अनधिकृत शाळांपैकी ११ शाळा एकट्या पनवेल तालुक्यात आहेत. यामध्ये प्लेजंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा (पनवेल), एस.ई.ए. अँड वुई ट्रस्ट मा आशा हिंदी स्कूल सुकापूर (पनवेल), बालाजी कान्हा पाटील हायस्कूल मोहा (पनवेल), प्लेजंट इंग्लिश मिडियम स्कूल अँड प्रायमरी सांगाडे (पनवेल), न्यू इंग्लिश मिडियम स्कूल चिंचपाडा (पनवेल), चांगुणाबाई ज्ञानदेव ठाकूर एज्युकेशन सोसा.प्रायमरी स्कूल उलवा (पनवेल), पराशक्ती इंग्लिश मिडियम स्कूल आपटा (पनवेल), होली स्पीरीट इंग्लिश मिडियम स्कूल आपटा (पनवेल), श्री सुविधा विद्यालय कामोठे (पनवेल), ह.भ.प.श्री. दामजी गणपत गोवारी विद्यालय कामोठे (पनवेल), रायझिंग सन प्री प्रायमरी स्कूल कामोठे (पनवेल) आणि वेदांत पब्लिक स्कूल पनवेल आपटा (पनवेल) या शाळांचा समावेश आहे. उर्वरित अनधिकृत घोषित शाळांमध्ये रायगड एज्युकेशन सोसा.प्राथ.शाळा चणेरा (रोहा), सेन्स प्रायमरी स्कूल जासई (उरण), रु ता गावंड संस्थेचे लिटिल वंडस स्कूल परळी (सुधागड)., डॉ.ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल रानवली (श्रीवर्धन), डॉ.ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल वाळवटी (श्रीवर्धन), श्री लक्ष्मीनारायण प्राथमिक विद्यामंदिर (अलिबाग), कै.सीताराम शिवराम कदम मराठी मिडियम स्कूल बिरवाडी (महाड) आणि फलाई इंग्लिश मिडियम स्कूल (माणगांव) या शाळांचा समावेश आहे.