शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात १९ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 04:49 IST

पोलादपूर-वाई-शिरूर राज्यमार्गावर शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास पोलादपूर आड येथे पंढरपूर येथील दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला.

पोलादपूर : पोलादपूर-वाई-शिरूर राज्यमार्गावर शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास पोलादपूर आड येथे पंढरपूर येथील दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. यात १९ प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तीन जखमींना पुढील उपचारासाठी महाडकडे रवाना करण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी गावातील वारकरी व भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. ते शनिवारी सकाळी दर्शन आटपून परत असताना महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर (पोलादपूर-वाई-शिरूर राज्यमार्ग) आड गावाजवळ आले. यावेळी बसचालक नीतेश सावंत (२८ रा. चिंचली-दापोली) घाट उतरत असताना ब्रेक न लागल्याने ती वेगाने उतारावरून खाली आली आणि रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. अपघातात बसचालकासह १८ प्रवासी जखमी झाले. हे सर्व प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रहिवासी आहेत.अपघातात शांता संजय साळवी (४३), प्रमिला साळवी (४५), प्रणाली साळवी (१९), प्रतिभा रघुराम कदम (३८), वसंत साळवी (६५), परशुराम कदम (४०), महादेव साळवी (५५), देवजी साळवी (६४), शेखर कदम (२६), शिवाजी शेलार (५०), गंगाराम गणपत साळवी (५३), सहदेव साळवी (७४), अनिता तुकाराम काजारी (४५), तुकाराम काजारी (५०), चंद्रभागा कदम (५०), रोहिणी रवींद्र काजारी (४०), पार्वती महादेव साळवी (५०), जयवंती गंगाराम साळवी (४८) या प्रवाशांसह चालक नीतेश साळवी (२८) (सर्व राहणार दिवाण खवटी, खेड, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.।बसचालकाविरोधात गुन्हाअपघातातील जखमींना तातडीने ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनाने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या वेळी तीन जखमींना महाडमध्ये हलविण्यात आले. यात शांता साळवी, नीतेश सावंत, पार्वती साळवी यांना पुढील उपचारासाठी महाड ट्रामा केअरमध्ये हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.