शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साइडपट्टी खोदल्याने १९ लाखांचा दंड; बांधकाम विभागाचा ठेकेदाराला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:29 IST

मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून महाड, रायगड मार्गाच्या साइडपट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी कंपनीच्या ठेकेदाराला १९ लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविली आहे.

महाड : मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून महाड, रायगड मार्गाच्या साइडपट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी कंपनीच्या ठेकेदाराला १९ लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविली आहे.रिलायन्स जिओ कंपनीच्या केबल टाकण्याचे काम करण्यासाठी कंपनीच्या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रीतसर परवानगी घेतली आहे. त्यासाठी १९ लाख रुपयांचा भरणादेखील केला आहे. मात्र, प्रत्यक्षात चर खणण्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांचे आणि अर्टी व शर्तींचे पालन ठेकेदाराने केलेले नाही. ज्या पद्धतीने चर खोदण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे साइडपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला त्वरित हरकत घेत हे काम बंद करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. त्याचबरोबर १९ लाख रुपये दंड भरण्याची नोटीसदेखील बजावल्याची माहिती विभागाचे शाखा अभियंता बोर्ले यांनी दिली.महाड-रायगड मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. लवकरच हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर, रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम करू नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्षभरापूर्वीच देण्यात आल्या आहेत, असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठेकेदाराला चर खोदण्याची परवानगी कशी दिली, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.प्रस्तावित महामार्ग हा काँक्रीटचा आणि दुपदरी असून, जिथे साइडपट्टी आहे तो भाग रस्त्याच्या खाली जाणार आहे. त्यामुळेही हे काम वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Raigadरायगड