शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

१८.६४ लाख बांबू व शेवग्याच्या रोपांची होणार लागवड, जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 11:33 IST

वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ते संगोपन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

अलिबाग : रायगड जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत १८ लाख ६४ हजार २५२ बांबू व शेवगा जातीची रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षलागवड कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली आहे.

वृक्षलागवड मोहीम सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे, नदी किनाऱ्यालगतच्या ठिकाणी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे, शेवग्याची रोपे नागरिकांनी आपल्या परसबागेत लावावीत आशा सूचना आहोत.

लागवड स्पर्धावृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ते संगोपन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संवर्धनासाठी शपथवृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसाहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवकांचा लोकसहभाग घ्यावा, वृक्षलागवड व संवर्धनासाठी शपथ देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.

वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खड्डे खोदणे, सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून मागणीप्रमाणे रोपे उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाची अंमलबजावणी तातडीने करावी, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दत्तक रोपे वृक्षलागवड यादी, फोटोसह सादर कराव्यात- किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद

टॅग्स :Raigadरायगड