शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

रायगड जिल्ह्यात वर्षभरात सर्पदंशाच्या 183 घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 1:40 AM

साप चावल्याने पाच जणांचा मृत्यू; दोन तासांत उपचार होणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शेतीची कामे जोरात सुरू असताना सर्पदंशाचेही प्रमाण वाढले आहे. सर्पदंशावर उपचारासाठी सरकारी दवाखान्यात औषधांसह सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १८३ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. यातील ५ जणांना उपचार सुरू असताना, आपला जीव गमवावा लागला आहे. सर्पाने दंश केलेल्या रुग्णांना  जीवदान देण्याचा प्रयत्न येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे.साप चावल्यानंतर पहिल्या दोन तासांत प्रथमोपचाराबरोबरच तत्काळ वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते, अन्यथा कोब्रा, फुरसा यांसारख्या सर्पाने दंश केल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते. सरकारी दवाखान्यात वेळेत रुग्ण आणूनही कधी डॉक्टर नाहीत, तर कधी व्हेंटिलेटर ऑपरेटर, तर कधी पुरेशी औषधे नाहीत, या कारणास्त नागरिकांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.  विंचू दंशावर लस शोधून काढणारे महाड येथील डॉ.हिंमतराव बाविस्कर यांच्या मते सर्पदंशावर वेळेत उपचार न मिळाल्यास किडण्या फेल होणे, यांसारखे आजार होतात.

साप चावताच काय काळजी घ्यावी जखम स्वच्छ पाण्याने धुवा.सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा. पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे. सर्पदंश झालेला भाग असेल, तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये. दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये. डॉक्टरांना कल्पना द्यावी, जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल.

गैरसमजुती आणि घ्यावयाची काळजी सापाचे विष मंत्राने उतरत नाही, सर्पदंशावर प्रतिसर्प (स्नेक अँटिव्हेनिन) विष हे एकमेव औषध आहे. व्यक्तीला कडुनिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका, कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका, धोतऱ्याच्या बिया वगैरे खाण्यास देऊ नका, गरम लोखंड लावणे (डागण्या देणे) चुकीचे आहे, दंश केलेला साप मारून अथवा जिवंत डॉक्टरांकडे नेऊन दाखवू नका, सर्प दंश होताना तो उलटला, तरच विषबाधा होते हे चुकीचे आहे, व्यक्तीने एकट्याने दवाखान्यात न जाता सोबत सहकारी घेऊनच जावे. 

टॅग्स :snakeसाप