शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नवसागर, गूळ पुरविणाऱ्या व्यापा-यासह १८ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:13 IST

गावठी दारूनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगावरच घाव घालण्याच्या हेतूने या गावठी दारू निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थांचा पुरवठा करणा-या व्यापा-यावर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे.

- जयंत धुळप अलिबाग : गावठी दारूनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगावरच घाव घालण्याच्या हेतूने या गावठी दारू निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थांचा पुरवठा करणा-या व्यापा-यावर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे.गावठी दारू समुळ नष्ट करण्याकरिता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिलेल्या आदेशान्वये, जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या धडक कारवाईत गावठी दारूकरिता नवसागर, गूळ पुरविणाºया व्यापाºयासह एकूण १८ जणांना अटक केली. कारवाईत १८ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे. अटक करण्यात आलेल्या १८ आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए. शेख यांनी दिली आहे.बेकायदा गावठी व हातभट्टीच्या दारूच्या अनुषंगाने अलिबाग, मांडवा, रेवदंडा, मुरु ड आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारू विक्र ी करणाºया एकूण सात आरोपींना रंगेहाथ पकडून, त्यांच्याकडून प्राप्त माहितीनंतर गावठी दारू पुरवठा करणाºया तिघांना अटक करण्यात यश आले. गावठी दारू पुरवठा करणाºयांना बोलते केल्यावर त्यांच्याकडून गावठी दारू तयार करणाºयांची माहिती मिळताच, दारू तयार करणाºया चौघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. गावठी दारू तयार करणाºया चौघांना गूळ, नवसागर व मीठ विकणाºया तिघा बड्या व्यापाºयांना रोहा आणि उल्हासनगर येथून अटक करण्यात आली.९०८० किलो गूळ, २४०० किलो नवसागर जप्तगेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३२८ सह महाराष्ट्र मद्यनिषिद्ध अधिनियम कलम ६५(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांत एक पिकअप व्हॅन, दोन कार, दोन मोटारसायकल,१ हजार ५७५ लिटर गावठी हातभट्टीची दारू,९ हजार ८० किलो गूळ, २ हजार ४०० किलो नवसागर, २५० किलो मीठ असा एकूण १८ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गावठी दारूची माहिती देण्याचे आवाहनपोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या आदेशाप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि जे.ए.शेख, सपोनि सचिन सस्ते, सपोनि दिलीप पवार,पोऊनि अमोल वळसंग, सफौ आर.बी.बिडकर, पोह ए.जे. बिर्जे, चापोह एन.आर.कोरम, पोह आर.बी.दबडे यांनी ही धडाकेबाज मोहीम यशस्वी केली आहे. जिल्ह्यात गावठी दारू प्रतिबंधात्मक कारवाई निरंतर सुरू राहणार आहे. नागरिकांना गावठी दारू विक्र ी,साठा, वाहतूक याबाबत माहिती मिळताच तत्काळ नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी, असे आवाहन पारसकर यांनी केले आहे.