शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील १७५ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:23 IST

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जानेवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उरण नगरपरिषदेचे १७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

उरण : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जानेवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उरण नगरपरिषदेचे १७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. कामबंद आंदोलनामुळ उरण नगरपरिषदेचे कामकाज ठप्प झाल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे मधुकर भोईर यांनी दिली.प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी २४ आॅगस्ट २०१७ रोजी राज्यातील संघटना संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये विविध मागण्यांसंदर्भात सर्व निर्णय ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे बैठकीत आश्वासन दिले होते; परंतु आज एक ते दीड वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही अद्यापही मागण्या प्रलंबितच आहेत. प्रलंबित प्रश्नासाठी सर्व संघटनेचे प्रतिनिधी शासनस्तरावर इतर विभागाच्या भेटी घेत आहेत. कर्मचाºयांकडून फक्त माहिती मागविण्याचेच काम सुरू आहे; पण कर्मचाºयांचे प्रश्न अजूनसुद्धा सुटलेले नाहीत. विविध समस्यांबाबत अद्यापही शासन आदेश निघालेले नाहीत, तसेच कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची माहिती कामगारनेते मधुकर भोईर यांनी दिली, त्यामुळे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना या राज्यातील सर्वच कामगार संघटनांंनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्याआधी तीन दिवसांपासून कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. मात्र, त्यानंतरही कामगारांच्या मागण्यांबाबतीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. संपात सहभागी झालेल्या १७५ कर्मचाºयांनी उरण नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळपासूनच जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. आंदोलनात हिंदू मजदूर सभेशी संलग्न असलेल्या संपूर्ण कोकणात कार्यरत असलेल्या म्युनिसिपल एम्प्लॉइज यूनियन आदी विविध कामगार संघटनाही संपात सहभागी होत असल्याची माहिती म्युनिसिपल एम्प्लॉइज यूनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.

टॅग्स :Strikeसंप