शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांतच 168 रुग्णांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 00:59 IST

काेराेनाचा विषाणू जिल्ह्यावर पडताेय भारी; पनवेल महापालिकेत सर्वाधिक मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्करायगडः काेराेनाच्या विषाणूने जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल १६८ रुग्णांचा गळा घाेटला आहे. पैकी एकट्या पनवेल महापालिकेत ६५ जण दगावले आहेत. दिवसाला १२००हून अधिक रुग्ण सापडत आहेत. वाढत्या काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न ताेकडे पडत असल्याचे दिसून येते.काेराेनाचा विषाणू सध्या जिल्ह्यावर प्रचंड वेगाने आघात करत आहे. आतापर्यंत ९६ हजार १२६ जणांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे, तर ८२ हजार ९२ जण काेराेना मुक्त झाले आहेत. दाेन हजार २७ रुग्ण काेराेनामुळे दगावले आहेत. सदरची आकडेवारी ही २२ एप्रिल २१ पर्यंतची आहे.काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र काेराेनाचा संसर्ग राेखण्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील आराेग्य व्यवस्था पुरती ढेपाळली आहे. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची चांगलीच फरफट हाेत आहे. सध्या १२ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पैकी तब्बल नऊ हजार १०१ रुग्णांवर घरातच उपचार केले जात आहेत. गेल्या १५ दिवसांपासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने पुढे सरकत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झाेप उडाली आहे.आराेग्य यंत्रणा सक्षम नसल्याने जिल्ह्यात रुग्णाबाबत हेळसांड हाेत आहे. हे काही आता लपून राहिलेले नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल १६८ रुग्णांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात दाेन लाख जणांचे लसीकरण पूर्णnकाेराेना विषाणूचा हाेणारा फैलाव राेखण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन जाहीर केला आहे, तसेच काेराेना लसीकरणही करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दाेन लाख ११ हजार ५५५ जणांनी काेराेनाची लस टाेचून घेतली आहे.n लस घेणाऱ्यांमध्ये फ्रंटलाइन वर्करची संख्या २९ हजार २६६, तर आरोग्य सेवकांची संख्या २७ हजार ९१० आहे. ४५ ते ६० वयाेगटांतील ७४ हजार ८३८ नागरिकांचा समावेश आहे. ६० वर्षांच्या पुढे लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ७९ हजार ५४१ अशी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या