शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्याला दिली १,४६९ पर्यटकांनी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:14 IST

आठ महिन्यांनी प्रथमच मोठी गर्दी, पर्यटनाला वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार

- वैभव गायकरपनवेल : अनलॉकनंतर पर्यटन क्षेत्र सुरू करण्यात आली आहेत. पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यही तब्बल आठ महिन्यांनंतर शनिवारपासून सुरू झाले. मात्र रविवारी प्रथमच कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी झालेली दिसून आली. १,४६९ पर्यटकांमुळे अभयारण्य हाउसफुल्ल झाले होते.कर्नाळा अभयारण्य हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. मुंबईकरांसाठी खूप सोईचे ठिकाण असल्याने मुंबई उपनगरातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यात विविध प्रकारच्या ६४२ वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती आहेत. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका  निसर्गवाटा पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ. येथे अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्वात आहेत. या ठिकाणी दोन युवकगृह उभारली आहेत. या ठिकाणी १६ जण एकाच वेळेला थांबू शकतात. परिसरात फोटोग्राफी करण्यासाठी १०० रुपयांची फी आकारली जाते . याव्यतिरिक्त प्रवेश फी ३०, पार्किंग फी २५ ते १०० रुपये आकारली जाते.नियमावली मास्क, सॅनिटायझर सोबत बाळगणे सक्तीचे.गरोदर महिला, ६५ वरील ज्येष्ठ नागरिक, १० वर्षां खालील मुलांना प्रवेश बंद. सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी. पर्यटकांना अभयारण्यात योग, व्यायाम कारण्यास मनाई अभयारण्य परिसरात पाण्याच्या साठ्यानजीक थांबण्यास तसेच पाण्यात उतरण्यास बंदी