शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील पर्यटनस्थळांसाठी १३७ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 03:22 IST

विकास आराखडा तयार : कामाच्या प्रस्तावानुसार निधी वितरीत होणार

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी सरकारने १३७ कोटी सात लाख ५५ हजार रु पयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती भाजपाचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली.अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रायगड जिल्हा पर्यटन आराखडा आणि त्यासाठी उपलब्ध झालेला भरीव निधी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सतीश लेले, उदय काठे, महेश मानकर, सुनील दामले, परशुराम म्हात्रे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्यामुळे देश-विदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यात येत असतात. या पर्यटकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर या वाढत्या पर्यटनाला रोजगाराची जोड लाभावी हा प्रामाणिक प्रयत्नही सरकारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आराखड्याच्या मान्यतेनुसार सरकारने पर्यटन विकासासही निधीची उपलब्धता करून दिली आहे. यामध्ये अलिबाग, मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी १३७ कोटी सात लाख ५५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पर्यटन विकासकामाच्या प्रस्तावानुसार निधी वितरीत केला जाणार असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले.पर्यटनाबरोबरच अलिबाग, मुरु ड तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अलिबाग तालुक्यातील बहुचर्चित असणारा सांबारकुंड मध्यम प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यात भाजपाला यश आले आहे. बाधितांच्या जमिनीच्या मोबदल्याचा निधी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. बाधितांना मिळणाऱ्या निधीच्या रकमेपैकी ३० कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाले आहेत. हा जमीन संपादनाचा निधी लवकरात लवकर वितरीत करण्याचे आदेश सरकारने जिल्हाधिकारी रायगड यांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.उसर खानाव परिसरातील एमआयडीसीमध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातील बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत वाढीव दर मिळवून देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन