शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १२७ कोटींचे कर्ज

By admin | Updated: September 8, 2015 00:02 IST

सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करण्याच्या परंपरेला आता छेद दिला जात आहे. जिल्हा अग्रणी बँकेच्या छताखाली असणाऱ्या २५ बँकांतील ४१३ शाखांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य केले आहे.

- आविष्कार देसाई,  अलिबागसावकाराकडून कर्ज घेऊन शेती करण्याच्या परंपरेला आता छेद दिला जात आहे. जिल्हा अग्रणी बँकेच्या छताखाली असणाऱ्या २५ बँकांतील ४१३ शाखांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य केले आहे. २७ हजार ८५९ शेतकऱ्यांना १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप त्यांनी केले आहे. यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ६७ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. कोकण विभागात पुन्हा अग्रस्थानी राहण्याचा मान बँक आॅफ इंडियाच्या रायगड शाखेने मिळविला आहे.जिल्ह्यातील शेतीच्या विकासातून शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी बँक आॅफ इंडियाने विशिष्ट नियोजन केले आहे. त्यानुसार विविध बँकांना टार्गेट देण्यात आले आहे. २०१५ या आर्थिक वर्षामध्ये १३७ कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले असून आतापर्यंत १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. १० कोटी रुपयांचे कर्ज अद्यापही वाटप करावयाचे शिल्लक आहे. पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्ग येथे मोठ्या संख्येने विकसित झाल्याचे दिसून येते. सुमारे ८५ टक्के कर्जदार कर्जाची परतफेड मुदतीत करत असल्याचेही उघड झाले आहे.पूर्वी येथील शेतकरी खाजगी सावकारांकडून शेतीसाठी कर्ज घ्यायचा. तेथे त्याची आर्थिक कुचंबणा केली जायची. आज मात्र जिल्ह्यातील परिस्थिती बदलत आहे. अग्रणी बँकेने घेतलेला पुढाकार, नागरिकांमध्ये करीत असलेली जनजागृती यामुळे बँकांकडे पाहण्याचा कल आता बदलत आहे. २०१२ या कालावधीमध्ये ४२ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले होते. त्याचप्रमाणे २०१३- ६१ कोटी रुपये, २०१४-८१ कोटी आणि २०१५ या वर्षी १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियानेही आतापर्यंत ७१५ शेतकऱ्यांना सुमारे १० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या आकडेवारीवरून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ३० हजार शेतकरीच सध्या कर्ज घेत आहेत. त्यामुळे विविध बँकांना रायगड जिल्हा ही मोठी आर्थिक बाजारपेठ असल्याचे निरीक्षण लिड बँकेने नोंदविले आहे.127 कोटी रुपयांच्या कर्जवाटपांमध्ये राष्ट्रीय बँकांचा हिस्सा हा ५१ कोटी ५६ लाख रुपयांचा आहे. खाजगी बँकांनी आठ कोटी १५ लाख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६७ कोटी २० लाख रुपये असे १२७ कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. स्टेट बँक आॅफ हैद्राबाद, अ‍ॅक्सिस बँकेने एक रुपयाचेही कर्ज शेतकऱ्यांना दिेले नाही.शेतकऱ्यांचा बँकांकडून कर्ज घेण्याचा कल वाढला हे खासगी सावकारांकडून कर्ज न घेण्याचेच द्योतक आहे. ज्या बँका कर्ज देण्यास नकार देतील त्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. शेतकऱ्यांनी बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्यावा आणि शेतीतून समृध्द व्हावे.-टी.मधुसूदन, अग्रणी बँक, जिल्हा प्रबंधक