शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिमाखात फडकतोय १२५ फूट उंच तिरंगा

By admin | Updated: August 14, 2015 23:39 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करताना खोपोलीजवळ एका कंपनीत उंचावर डौलाने फडकणारा तिरंगा पाहिल्यानंतर आपसूकच आपले हात तिरंग्याला सलाम करण्यासाठी वर येतात.

- अमोल पाटील,  खालापूरमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करताना खोपोलीजवळ एका कंपनीत उंचावर डौलाने फडकणारा तिरंगा पाहिल्यानंतर आपसूकच आपले हात तिरंग्याला सलाम करण्यासाठी वर येतात. पुण्याकडून मुंबईकडे येताना बोरघाट संपल्यानंतर डावीकडे व मुंबईतून पुण्याला जाताना फूडमॉल सोडल्यानंतर उजव्या बाजूला हा तिरंगा डौलाने फडकताना दिसतो. सुमारे १२५ फूट उंचीवर हा तिरंगा असून येथून प्रवास करताना तिरंग्याकडे पाहिल्यानंतर अभिमानच वाटतो. एका कंपनी मालकाने हा तिरंगा झेंडा उभा केला असून एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चर्चेचा विषय झाला आहे.खोपोलीजवळ साजगाव औद्योगिक परिसरात ढेकू येथे एका कंपनीवर १२५ फूट उंचीवर तिरंगा झेंडा लावण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेनंतर राज्यात इतक्या उंचीवर लावण्यात आलेला हा दुसरा राष्ट्रध्वज आहे. अनेक प्रवासी हा तिरंगा पाहण्यासाठी काही काळ रस्त्यावर थांबतात. कंपनीचे मालक व्ही. आर. शेरीफ, रा. मुंबई यांच्या संकल्पनेतून या तिरंग्याची निर्मिती झाली आहे. देशाप्रति असलेले प्रेम व एक्सप्रेस-वेलगत कारखाना असल्याने राष्ट्रध्वज उभारण्याची संकल्पना सुचल्याचे कंपनीचे व्यवस्थापक सचिन शालिग्राम यांनी सांगितले. (वार्ताहर) दिल्लीतील एका मॉलवर देशातील सर्वात उंच आणि रात्रंदिवस तिरंगा फडवण्यात येतो. महाराष्ट्रात हा मान नवी मुंबई महापालिकेने मिळवला आहे. तर हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच झेंडा आहे.राष्ट्रीय दुखवटा असेल तर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतो. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती, पूर, वादळी वाऱ्यामुळे राष्ट्रध्वज बाधित होत असेल तर तो उतरविण्यात येतो, अन्यथा दिवसरात्र हा राष्ट्रध्वज एक्स्प्रेस-वेची शान वाढवत दिमाखात डोलत असतो. जून २०१५ मध्ये झालेल्या एका कार्यक्र मात १२५ फूट उंचीवर असलेला हा तिरंगा फडकविण्यात आला. अनेक प्रवाशांना या तिरंग्याने भुरळ घातली असून मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या उत्सुकतेचा हा विषय झाला आहे.