शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केम्सस्पेक जळीत कांडामुळे १२०० कामगार वाऱ्यावर... कंपनीचे शेकडो कोटींचे नुकसान

By वैभव गायकर | Updated: December 29, 2023 16:50 IST

तळोजा एमआयडीसी मधील पडघे गावाजवळील केम्सस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दि.२८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

वैभव गायकर,पनवेल : तळोजा एमआयडीसी मधील  पडघे गावाजवळील केम्सस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दि२८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.कॉस्मेटिकसाठी लागणार कच्चा माल बनविणाऱ्या या कंपनीचे शेकडो कोटींचे या घटनेत नुकसान झाले असुन या कंपनीत तसेच कंपनीशी जोडले गेलेले जवळपास १२०० कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे.        

 केमिकलची कंपनी असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट धरला.यावेळी जवळपास 200 टन ज्वलनशील रॉ मटेरियल कंपनीत असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट धरला.मध्यरात्री 2 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले तो पर्यंत अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करून आग विझवत होते.कंपनीला लागणाऱ्या आगीच्या घटनांबाबत देखील साशंकता व्यक्त केली जात आहे.यापूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेत देखील कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेची चौकशीची मागणी देखील जोर धरू लागली आहे.तळोजा एमआयडीसी मध्ये आद्योगिक सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत की नाही ? याबाबत देखील प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.         

या कंपनीत बनवला जाणारा कॉस्मेटिक चा रॉ मटेरियल इतर कंपन्यांना सप्लाय केला जात होता.त्यामुळे या साखळीतील सर्वच कामगार बेरोजगार होणार असल्याचे या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले.दरम्यान या घटनेबाबत अधिक माहितीसाठी डेप्युटी डीआयआर आरिफ तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील दोन दिवसात घटनेबाबत माहिती देता येईल.आमचा तपास सुरु असुन दोन दिवसात घटनेची कारणे ,नुकसान याबाबत माहिती देता येईल असे सांगितले.   चौकट - कंत्राटी कामगार रस्त्यावर या घटनेमुळे कंत्राटी कामगारांना सर्वात मोठा फटका बसणार आहे.अचानक काम थांबल्याने

टॅग्स :panvelपनवेलMIDCएमआयडीसी