शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहा खारभूमी योजनांसाठी ११९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:51 IST

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील किनारी भागातील दोन तर रायगड जिल्ह्याच्या किनारी भागातील ६ अशा एकूण ८ खारभूमी योजनांच्या नूतनीकरणाकरिता १४१ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे.

- जयंत धुळपअलिबाग - राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील किनारी भागातील दोन तर रायगड जिल्ह्याच्या किनारी भागातील ६ अशा एकूण ८ खारभूमी योजनांच्या नूतनीकरणाकरिता १४१ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. या निधीपैकी २५ टक्के निधी राज्य शासनाने दिला आहे तर उर्वरित ७५ टक्के निधी राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून जागतिक बँकेने दिला आहे.रायगड जिल्ह्यातील सहा खारभूमी योजनांच्या नूतनीकरणाकरिता ११९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या सर्व योजनांचे काम पूर्ण झाल्यावर २ हजार ११ हेक्टर भातशेती जमीन पुनर्प्राप्त होणार आहे.जिल्ह्यातील सहा खारभूमी योजनांच्या नूतनीकरणाअंती एकूण ३४.५ किमीची किनारपट्टी संरक्षित होणार आहे. जागतिक बँकेने दिलेल्या नियोजनानुसार खारभूमी योजनांचे नूतनीकरण करताना खारभूमी योजनेचा संरक्षक बंधारा हा चारचाकी वाहनांची वर्दळ होऊ शकेल, इतक्या रुंदीचा असणे अपेक्षित आहे.आधी बांधलेल्या संरक्षण बंधाऱ्याचे रुंदीकरण करणे गरजेचे असून ते बांधाशेजारील शेतकºयांच्या दोन-चार फूट जागेत होणार आहे. ती जागा शेतकºयांच्याच मालकीची राहणार आहे. त्या जागेचे भूमी संपादन करून जागा शासन ताब्यात घेणार नाही, अशी माहिती खारभूमी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता शिवयोगी स्वामी यांनी दिली आहे.बांधाच्या रुंदीकरणामुळे किनारी भागात नैसर्गिक वा अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास आपत्ती निवारण यंत्रणेचे वाहन तत्काळ घटनास्थळी पोहोचू शकेल. परिणामी किनारी भागातील सुरक्षा वृद्धिंगत होवून, आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सहाय्य वा मदत तत्काळ पोहोचू शकणार असल्याचे स्वामी यांनी पुढे सांगितले. बंधारे बांधण्यासाठी जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध होणार असला तरी लोकसहभागही आवश्यक आहे. श्रमदानातून हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प उद्दिष्टेखारभूमी योजनेलगतच्या गावांतील ग्रामस्थांचे त्सुनामी आणि चक्रीवादळापासून संरक्षण करणे.ग्रामस्थांची शेतजमीन, घरे व मालमत्तांचे त्सुनामी आणि चक्रीवादळापासून संरक्षण करणे.गावांतील पिण्याच्या गोड्या पाण्याच्या स्रोतांचे समुद्राच्या खाºया पाण्यापासून संरक्षण करणे.कृषी उत्पादक जमिनीचे खाºया पाण्यापासून संरक्षण करणे.त्सुनामी आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संरक्षणात्मक उपाययोजना करणे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या