शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी संपात रायगड जिल्ह्यातील 1150 रेशनिंग दुकानदार सहभागी

By निखिल म्हात्रे | Updated: January 1, 2024 21:29 IST

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सोमवारपासून (1 जानेवारी) आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला आहे.

अलिबाग - रास्तभाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारकांनी आजपासून (1 जानेवारी) देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सर्व रेशनिंग दुकानदार सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेशनिंग दुकाने बंद राहणार असल्याने नागरिकांना धान्य मिळणार नाही. सोमवारपासून रायगड जिल्हयातील सर्व 1 हजार 150 दुकाने बंद राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी दिली.

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सोमवारपासून (1 जानेवारी) आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला आहे. देशपातळीवरही ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनने अशाच पद्धतीने बेमुदत बंद पुकारला आहे. राज्यात सुमारे 53 हजार रेशन दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. यापूर्वीच्या आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. त्यानंतर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन काळात महासंघाच्या निवेदनाची दखल घेत नागपूरला सचिवांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासन देण्यात आले. मात्र, निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्यावतीने एक जानेवारीपासून ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे. बंदच्या काळात दुकानदारांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत. तसेच, कोणत्याही प्रकारे धान्याची उचल आणि वितरण करू नये, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यात 1 हजार 150 रेशनिंग दुकाने आहेत. ही सर्व दुकाने संपात सहभागी होणार असून बंद राहणार आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरु राहणार आहे. 16 तारखेला रेशनिंग दुकानदारांतर्फे दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहेत, त्यातही रायगड जिल्ह्यातील दुकानदार सहभागी होतील, अशी माहिती  रायगड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी दिली.

अलिबाग तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले की, अलिबाग तालुक्यात 82 रेशनिंग दुकाने आहेत, ती सर्व संपामुळे बंद राहणार आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासनाकडे संघटनांनी पाठपुरावा केलेला आहे. शासन फक्त आश्वासन देत आहे. कार्यवाही करीत नाही. प्रति क्विंटलचे मार्जिन 150 वरून 300 रुपये करावे यासह इतर मागण्या आहेत. तसेच सहा-सहा महिने दुकानदारांना मार्जिन मिळत नाही. त्यामुळे नोकरांचे पगार, भाडे, लाईट बील हा खर्च कर्ज काढून करावा लागतो. महिन्याचे मार्जिन त्याच महिन्यात मिळाले पाहिजे. रेशनिंग दुकानदारांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 1 जानेवारीपासून बेदमुत संप पुकारल्याचे महेंद्र पाटील यांनी सांगितले. या संपावर शासनाकडून तोडगा न निघाल्यास सोमवारी वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेशनिंग दुकाने बंद राहणार असून गोरगरीबांना धान्य मिळणार नाही.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड