शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

११० वर्षांच्या गंगूबाईंचा मतदान केंद्रावर होणार सत्कार; निवडणूक आयोगाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 06:38 IST

लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतदान करणाऱ्या ज्येष्ठ मतदार

अलिबाग : देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वप्रथम १९५२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावत असलेल्या महाड तालुक्यातील आमशेत या छोट्या गावातील ११० वर्षांच्या वयोवृद्ध गंगूबाई चव्हाण या यंदाच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत देखील मंगळवार, २३ एप्रिल रोजी मतदान करणार आहेत. थेट गंगुबाई चव्हाण यांची मुलाखत रविवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर, त्याची तत्काळ दखल रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेवून, भारत निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी २३ एप्रिल रोजी महाड तालुक्यातील आमशेत मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते गंगूबाई चव्हाण यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, ११० वर्षांच्या ज्येष्ठ मतदार गंगूबाई चव्हाण यांना निवडणूक यंत्रणेच्या वाहनाने त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मानाने आमशेत मतदान केंद्रावर आणण्यात येईल. त्यांचे मतदान झाल्यावर त्याच ठिकाणी त्यांचा हा यथोचित सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर पुन्हा निवडणूक यंत्रणेच्या वाहनाने त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या घरी पोच करण्यात येईल, अशी माहिती महाड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड