शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२६ शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: June 14, 2017 03:13 IST

दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता मंगळवारी संपली. दहावीच्या निकालावरून समाज माध्यमांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता मंगळवारी संपली. दहावीच्या निकालावरून समाज माध्यमांवर उसळलेल्या उलटसुलट चर्चेवर राज्य मंडळाने आॅनलाइन निकाल जाहीर करून अखेर पडदा टाकला. जिल्ह्याचा निकाल हा ८९.९३ टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातील ५४४ शाळांपैकी १२६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ जुलैपासून परीक्षा घेण्यात येणार आहे.मार्च २०१७ मध्ये दहावीची परीक्षा पार पडली होती. जिल्ह्यातून तब्बल ३७ हजार ७८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जीवनाला दिशा देणाऱ्या या परीक्षेमध्ये मुलींनी उत्तुंग कामगिरी करत मुलांना मागे टाकले आहे. जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांच्या सुमारे ५४४ शाळा आहेत. पैकी १२६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. या शाळेतील दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे केवळ १० टक्केच आहे. १४ जूनपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतींसाठी अर्ज करता येणार आहेत. याबाबतच्या अर्जाचा नमुना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा मंडळामार्फत पुन्हा १८ जुलै २०१७ पासून परीक्षा घेण्यात येणार आहे.