शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

पेण नगरविकास आघाडीच्या १० नगरसेवकांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 02:27 IST

पेण नगर परिषदेच्या नगरविकास आघाडीच्या ८ नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे व पालिकेचे विरोधी पक्षनेते निवृत्ती पाटील यांच्या नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत भाजपाला रामराम ठोकला.

पेण : पेण नगर परिषदेच्या नगरविकास आघाडीच्या ८ नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे व पालिकेचे विरोधी पक्षनेते निवृत्ती पाटील यांच्या नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत भाजपाला रामराम ठोकला. एमएमआरडीए क्षेत्रातील विकासकामांच्या निधीबाबत अनेक वेळा प्रत्यक्ष गाठीभेटी व पत्रव्यवहार करूनसुद्धा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी सहकार्य न केल्यामुळे आम्ही पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे देत असल्याचे त्यांनीम्हटले आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.नगरसेवकांनी गेल्या अडीच वर्षांत अनेक विषयांशी संबंधित मदतीची अपेक्षा केलेली असताना ती मदत भाजपाच्या पक्षनेतृत्वाने केली नाही, असा आरोप नगरविकास आघाडीचे मुख्य समन्वयक संतोष शृंगारपुरे व विरोधी पक्षनेते निवृत्ती पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर नगरपालिकेच्या वॉर्डमध्ये मतदारांना दिलेली आश्वासने व विकासकामांसाठी निधी तसेच एमएमआरडीए मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या फंडातून मोठ्या कामासाठी जी विकास निधीची आवश्यकता होती त्याबाबत अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या कामाचे प्रस्ताव देऊनसुद्धा सदरचा विकास निधी आम्हाला पक्षश्रेष्ठीकडून प्राप्त झाला नाही. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अल्टिमेटम दिलेला होता. त्यानंतरदेखील याबाबतची दखल घेतली गेली नाही. अखेर आम्ही सर्व नगरसेवकांनी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सध्या कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. मात्र, आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले.काँग्रेस विरुद्ध नगरविकास आघाडीची लढतपेण नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध नगरविकास आघाडी अशी चुरशीची लढत झाली होती. नगरविकास आघाडीचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शृंगारपुरे यांना पेण शहरातून तब्बल १० हजारावर मताधिक्य मिळालेले होते. २ हजार मतांनी त्यांचा निसटता पराजय झाला होता. आघाडीचे भाजपाप्रणीत ७ नगरसेवक व मित्रपक्ष असलेल्या शेकाप पक्षाचे ३ नगरसेवक असे १० नगरसेवक नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले होते. यानंतर झालेल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडणुकीत या गटाचा आणखी एक उमेदवार निवडून आलेला होता.

टॅग्स :Resignationराजीनामा